वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेतील सर्वोच्च न्यायालय गर्भपाताला अवैध ठरवणारा त्याचा वर्ष १९७३ मधील निर्णय पालटू शकते, असा न्यायालयातील एक मसुदा फुटला आहे. न्यायालयानेही त्याचा या दृष्टीनेच विचार चालू असल्याचे अधिकृतरित्या घोषितही केले. राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी मात्र या निर्णयाला विरोध दर्शवला आहे. त्यांनी नोव्हेंबर मासात होणाऱ्या एका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना आवाहन केले की, त्यांनी गर्भपाताच्या महिलांच्या अधिकारांचे समर्थन करावे. सध्या अमेरिकेमध्ये महिलेला गर्भपात करण्याचा अधिकार आहे. अमेरिकी संसद गर्भपाताच्या सूत्रावर ५०-५० टक्के विभागली असून बहुतांश डेमोक्रॅट्स हे गर्भपाताच्या बाजूने असून रिपब्लिकन्स हे त्याला विरोध दर्शवत आहेत.