अमरावती – येथील खासदार सौ. नवनीत राणा यांनी २ सहस्र महिलांच्या समवेत १२ एप्रिल या दिवशी रवी नगर परिसरात हनुमान चालिसाचे पठण केले. तेथील संकटमोचन हनुमान मंदिरात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आवाहनानंतर सध्या राज्यभरात हनुमान चालिसाचे पठण करण्यात येत असल्याने या कार्यक्रमाची शहरात चर्चा चालू झाली आहे.