उपेक्षित वारकरी !

वारी मार्गावर पाणी, आरोग्य, स्वच्छता यांसारख्या प्राथमिक सुविधाही वारकर्‍यांना मिळत नाहीत. दोन्ही वारी मार्गांवर अनेक वेळा अपघात झाल्यामुळे वारकर्‍यांसाठी स्वतंत्र मार्गांची अनेक वेळा घोषणा झाली; मात्र प्रत्यक्षात तरी ती अजून कृतीत न येणे, हे चिंताजनक आहे.

करहर (सातारा) येथील श्री विठ्ठल मंदिराला पोलीस छावणीचे स्वरूप !

आषाढी एकादशीनिमित्त कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिपंढरपूर समजल्या जाणार्‍या सातारा जिल्ह्यातील करहर येथील श्री विठ्ठल मंदिर परिसराला २० जुलै या दिवशी पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते.

विठ्ठल, विठ्ठल आणि विठ्ठलच..!

हिंदुद्वेष्टे यांनी हिंदु धर्माच्या विरोधात कितीही गरळओक केली, तरी हिंदूंच्या मनातील भगवंतभेटीचा भक्तीरस अखंड वहात आहे, जो वारीच्या निमित्ताने अनुभवता आला. वारीच्या दिवशी  प्रत्येक हिंदूच्या मनात विठ्ठल, विठ्ठल आणि विठ्ठलच अनुभवता आला !

‘विठाई’ बसवरील चित्राद्वारे श्री विठ्ठलाची होत असलेली विटंबना रोखा ! – हिंदुत्वनिष्ठांचे जिल्हा प्रशासनास निवेदन

सध्या ‘विठाई’च्या काही बसगाड्यांच्या बाहेरील भागात असलेल्या श्री विठ्ठलाच्या चित्रावर थुंकल्याचे डाग, चिखलाचे डाग, तसेच धूळ दिसून येत आहे. ही एकप्रकारे श्री विठ्ठलाच्या चित्राची विटंबनाच आहे.

आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्र्यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणी यांची सपत्नीक महापूजा !

आषाढीतील वारकर्‍यांनी तुडुंब भरलेले पंढरपूर पहायला मिळू दे ! – मुख्यमंत्र्यांची श्री विठुरायाला प्रार्थना, महापूजेनंतर मंदिर समितीच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि कोलते दाम्पत्य यांचा सत्कार करण्यात आला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून आषाढी एकादशीच्या निमित्ताने मराठीत ट्वीट करून शुभेच्छा !

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हटले की, वारकरी चळवळ ही आपल्या उत्कृष्ट परंपरेचे उदाहरण असून समानता आणि एकता यावर भर देणारी आहे.

पंढरपूरच्या पायी वारीला अनुमती देण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली !

कोरोनामुळे गेल्या वर्षी पंढरपूरची पायी वारी रहित करण्यात आली होती. यंदाही राज्यशासनाने पायी वारीला अनुमती दिलेली नाही; मात्र प्रमुख १० दिंड्यांना बसद्वारे जाण्याची अनुमती देण्यात आली आहे.

‘विठाई’ बसवरील श्री विठ्ठलाचे चित्र बसच्या आतील बाजूने लावण्यात यावे ! – राष्ट्रीय वारकरी परिषदेची परिवहनमंत्र्यांकडे मागणी

श्री विठ्ठलाची विटंबना रोखण्यासाठी बसच्या बाहेरील भागात असलेले विठुरायाचे चित्र बसच्या आतील बाजूला लावण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रीय वारकरी परिषदेने केली आहे.

वारकरी संप्रदाय, विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांच्या वतीने पुणे येथे आंदोलन !

पालखी सोहळ्यात वारकर्‍यांनी सहभागी होण्याविषयी राज्य सरकारने जाचक अटी घातल्या आहेत आणि ह.भ.प. संतवीर बंडातात्या कराडकर यांना पोलिसांनी स्थानबद्ध केले आहे. याचा निषेध करण्यासाठी आंदोलन करण्यात आले.

पायी वारीला अनुमती न दिल्यास तीव्र सत्याग्रह करू !

सरकारने वारीला अनुमती दिली नाही, तर येत्या काळात वारकर्‍यांच्या वतीने व्यापक आणि उग्र स्वरूपाचा सत्याग्रह केला जाईल, अशी चेतावणी समस्त वारकरी समाजाच्या वतीने प्रशासनाला देण्यात आली आहे.