सनातनच्या देवद, पनवेल येथील आश्रमात ह.भ.प. (पू.) निवृत्ती महाराज वक्ते यांचे संतपद घोषित !

ह.भ.प. (पू.) निवृत्ती महाराज वक्ते यांच्या सनातनच्या देवद येथील आश्रमातील सन २०१६ च्या भेटी वेळीच त्यांचे संतपद घोषित करण्यात आले. परात्पर गुरु पांडे महाराज यांनी त्यांचा शाल, श्रीफळ, प्रसाद आणि श्रीकृष्णाचे चित्र देऊन सन्मान केला होता.

हिंदुत्वाचा आधारवड हरपला !

धर्मतेजाने हिंदु समाजाला असलेले धर्माविषयीचे अज्ञान दूर करणार्‍या या महान संत विभूतीच्या जाण्याने हिंदु समाजात मोठी पोकळी निर्माण झाली आहे; देहाने जरी अस्तित्वात नसले, तरी निर्गुणातून त्यांचे कार्य चालूच रहाणार. धर्मरक्षणार्थ झटण्यासाठी त्यांनी धर्मप्रेमींना बळ आणि आशीर्वाद द्यावेत, हीच त्यांच्या चरणी प्रार्थना !

प्रसिद्धीलोलूप तृप्ती देसाई यांच्यावर कडक कारवाई करा ! – राष्ट्रीय वारकरी परिषदेची मागणी

प्रसिद्धीच्या हव्यासापोटी फलक काढण्यास गेलेल्या तृप्ती देसाईंना अटक करण्यात आली असली, तरी त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रीय वारकरी परिषदेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

अकोला येथे भजन आणि कीर्तन यांसाठी वारकरी संघटनांचे आमरण उपोषण !

वारकर्‍यांकडून उपोषणस्थळी सरकारला सद्बुद्धी मिळावी, यासाठी संत गजानन महाराज यांच्या मूर्तीसमोर ‘सद्बुद्धी यज्ञ’ करण्यात आला. 

महाराष्ट्रातही लव्ह जिहाद विरोधी कायदा लागू करण्याची राष्ट्रीय वारकरी परिषदेची मागणी !

प्रेमाच्या नावाखाली अनेक मुली आणि महिला यांचे जीवन उद्ध्वस्त करणार्‍या ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात उत्तरप्रदेशात एका अध्यादेशाद्वारे लव्ह जिहाद कायदा लागू करण्यात आल्यानंतर महाराष्ट्रातही असा कायदा त्वरित लागू करावा, अशी मागणी राष्ट्रीय वारकरी परिषदेने केली आहे.

मर्यादित संख्येतील वारकर्‍यांच्या उपस्थितीत कार्तिक वारीला अनुमती

कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर यंदा २४ नोव्हेंबरला होणारी पंढरपूर कार्तिकी वारी आणि ११ डिसेंबरला होणारी आळंदी वारी ही किमान वारकर्‍यांच्या उपस्थितीत पार पडावी, याविषयी शासन सकारात्मक निर्णय घेईल.