पंतप्रधान मोदी यांना देहू (जिल्हा पुणे) येथील शिळा मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याचे वारकरी संप्रदायाकडून आमंत्रण !

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि संतश्रेष्ठ जगदगुरु तुकाराम महाराज यांच्या पालखी मार्गांचे भूमीपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले.

पंढरपूर (जिल्हा सोलापूर) येथे चंद्रभागा माता मंदिराचा जिर्णोद्धार संकल्प सोहळा उत्साहात !

येत्या ६ मासांमध्ये मंदिराच्या जिर्णोद्धाराचे काम पूर्ण करण्यात येणार असून परिसर स्वच्छ आणि पवित्र राखण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात येणार आहेत.

पंढरपूर (जिल्हा सोलापूर) येथे चंद्रभागा माता मंदिराचा जिर्णोद्धार संकल्प सोहळा उत्साहात ! 

वारकरी संप्रदाय पाईक संघाचे संस्थापक ह.भ.प. देवव्रत (राणा) महाराज वासकर, आर्ट ऑफ लिव्हिंग, तसेच महा.एन्.जी.ओ. फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने येथील चंद्रभागा माता मंदिराचा जिर्णोद्धार आणि परिसराचा विकास प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.

समस्त वारकरी फडकरी दिंडी समाज संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी ह.भ.प. संजय महाराज देहूकर !

वारकरी संप्रदायातील शिखर संघटना म्हणून ओळख असलेल्या समस्त वारकरी फडकरी दिंडी समाज संघटनेची सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली. यात संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी ह.भ.प. संजय महाराज देहूकर यांची निवड करण्यात आली.

श्रद्धेय कालिचरण महाराज यांच्यावर टीका करणार्‍यांनी ते हिंदूंचे धर्मगुरु आहेत, हे विसरू नये ! – ह.भ.प. अरुण महाराज पिंपळे, राष्ट्रीय वारकरी परिषद

जगातील हिंदूंचा निर्वंश होऊ नये आणि देशातील हिंदू समाज गुलाम होऊ नये यासाठी कालीपूत्र कालिचरण महाराज प्रचार अन् प्रसार करत आहेत. त्यांचे कार्य बंद पाडण्यासाठी, तसेच त्यांना अपकीर्त करण्यासाठी सुनियोजित प्रयत्न चालू आहेत.

सनातन संस्थेवर नव्हे, तर हिंदुद्रोही मंत्र्यांवरच बंदी घाला ! – ह.भ.प. कारभारी साहेबराव अंभोरे महाराज, उपाध्यक्ष, राष्ट्रीय वारकरी परिषद

महाराष्ट्र ही संत आणि शूर यांची भूमी असूनही येथे प्रतिदिन हिंदुविरोधी भूमिका घेतली जाते. हे योग्य नसून हिंदु धर्माची पताका सर्वत्र फडकवणार्‍या सनातन संस्थेवर बंदीची मागणी करणार्‍या मंत्र्यांना आवर घालणे आवश्यक आहे.

विधानसभेत हिंदुहिताच्या गोष्टींची चर्चा केव्हा होणार ? – ह.भ.प. मारुति महाराज तुनतुने शास्त्री, अध्यक्ष, राष्ट्रीय वारकरी परिषद

महाराष्ट्र ही संतांची भूमी असली, तरी विधानसभेत हिंदुविरोधी विधाने आणि कृती होत असल्याचे दिसून येते, असेही ते म्हणाले.

आज आळंदी (पुणे) येथे राष्ट्रीय वारकरी परिषदेच्या वतीने वारकरी महाअधिवेशन आणि धर्मसभा यांचे आयोजन !

आळंदी देवाची येथे १ डिसेंबर या दिवशी दुपारी ३ वाजता श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त राष्ट्रीय वारकरी परिषदेच्या वतीने वारकरी महाअधिवेशन आणि धर्मसभा यांचे आयोजन करण्यात आले आहे.

संतांच्या विचारांमुळे महाराष्ट्रात वैचारिक प्रगल्भता ! – अजित पवार, उपमुख्यमंत्री

पिंपळनेर येथील वाड्याचा जिर्णोद्धार आणि सभामंडप यांसाठी राज्य सरकारने ५० लाखांचा निधी घोषित केल्याचे पवार यांनी सांगितले.

वेलतूर (नागपूर) येथे पोलिसांनी देवतांची चित्रे असलेल्या फटाक्यांची विक्री केली जाणारी ३ दुकाने बंद केली !

राष्ट्रीय वारकरी परिषदेने दिलेल्या निवेदनाचा परिणाम !