आषाढी वारीला अनुमती नाकारल्याच्या निषेधार्थ विश्व हिंदु परिषदेचे राज्यात १५४ ठिकाणी तीव्र भजनी आंदोलन !

आषाढी वारीसाठी पंढरपूर येथे पायी जाण्याची अनुमती नाकारल्याच्या निषेधार्थ १७ जुलै या दिवशी विश्व हिंदु परिषदेच्या वतीने राज्यात १५४ ठिकाणी तीव्र भजनी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात वारकरी संप्रदायही सहभागी झाला होता.

कीर्तनकारांनी सर्वधर्मसमभाव शिकवण्याच्या नावाखाली हिंदु धर्म, देवता आणि संत यांच्यावर टीका करू नये !

कीर्तनकारांनी भावनेच्या भरात सर्वधर्मसमभाव शिकवण्याच्या नावाखाली हिंदु धर्म, देवता आणि संत यांच्याविषयी टीका करू नये, असे आवाहन राष्ट्रीय वारकरी परिषदेचे कार्याध्यक्ष ह.भ.प. बापू महाराज रावकर यांनी प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून केले आहे.

वारीला बंदी घालून शासनाने फार मोठा अपराध केला ! – पू. संभाजीराव भिडेगुरुजी

संतवीर बंडातात्या कराडकर यांच्यावर झालेल्या कारवाईच्या निषेधार्थ श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचा कराड (जिल्हा सातारा) येथे मोर्चा

पायी वारीसाठी निघालेले संतवीर बंडातात्या कराडकर यांना कह्यात घेऊन सोडले !

पायी वारीसाठी निघालेले संतवीर बंडातात्या कराडकर यांना पोलिसांनी कह्यात घेतले आहे. त्यांना फलटण येथील गुरुकुलमध्ये ठेवण्यात आले आहे. संतवीर बंडातात्या कराडकर यांना दिसताच क्षणी कह्यात घेण्याचा आदेश पोलिसांना देण्यात आला होता.

संतवीर बंडातात्या कराडकर यांना दिसता क्षणी कह्यात घेण्याचे पुणे ग्रामीण पोलिसांना आदेश !

पायी वारीला जाण्यासाठी महाराष्ट्रातील वारकर्‍यांना ३ जुलै या दिवशी आळंदी येथे येण्याचे आवाहन संतवीर बंडातात्या कराडकर यांनी केले होते.

माऊलींच्या प्रस्थान सोहळ्यापूर्वी आळंदीच्या (पुणे) नगराध्यक्षांसह २२ वारकरी कोरोना ‘पॉझिटिव्ह’ !

कोरोना ‘पॉझिटिव्ह’ असलेले वारकरी आळंदीत दाखल झाल्यानंतर अन्य ज्यांच्या संपर्कात आले असतील त्यांनी त्वरित आर्.टी.पी.सी.आर्. चाचणी करून घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

मानाच्या पालख्यांसमवेत अन्य दिंड्यांना सहभागी करून घेण्याची वारकर्‍यांची मागणी अमान्य !

पालखी प्रस्थान सोहळ्याला आळंदी आणि देहू या ठिकाणी प्रत्येकी १०० जणांना, तर अन्य ठिकाणी प्रत्येकी ५० वारकर्‍यांना उपस्थित रहाता येणार आहे.

पंढरपूर येथील आषाढी वारीसाठी वारकरी ३ जुलैला आळंदी येथून प्रस्थान करणार ! – संतवीर बंडातात्या कराडकर

यंदाही वारकरी संप्रदायाशी चर्चेचे नाटक करून पादुका सोहळा पायी जाऊ नये, असा एकतर्फी निर्णय घोषित केला. वारकरी संप्रदायाच्या किमान १०० लोकांसमवेत हा सोहळा होण्याच्या भावनेचा चुराडा केला आहे.

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीवर राजकीय व्यक्तीच्या नियुक्तीस ‘विश्व वारकरी सेने’चा विरोध

असा विरोध का करावा लागतो ? प्रशासनाच्या ते लक्षात येत नाही का ?

मिरजेतील ‘वारकरी भवन’चे उदघाटन !

वारकरी भवनचे उद्घाटन भाजप आमदार सुरेश खाडे आणि ह.भ.प. हरिदास बोराटे महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.