कोरोना काळात अडचणीत सापडलेल्या वारकरी संप्रदायातील कीर्तनकार आदींना मिळणार मानधन !

सांस्कृतिक कार्य मंत्रालयाचा निर्णय

प्रतिकात्मक छायाचित्र

पंढरपूर (जिल्हा सोलापूर) – कोरोना संसर्गाच्या काळात अडचणीत आलेल्या महाराष्ट्रातील ४८ सहस्र कलावंतांना प्रतिमाह ५ सहस्र रुपयांचे मानधन देण्याचा निर्णय सांस्कृतिक कार्य मंत्रालयाने घेतला होता. यात आता वारकरी संप्रदायाचाही समावेश करण्यात आला आहे. वारकरी संप्रदायातील कीर्तनकार, गायक आणि पखवाजवादक यांनाही आता ५ सहस्र रुपयांचे मानधन प्रतिमाह देण्यात येणार आहे. वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांच्यासमवेत बैठक घेतली होती. या वेळी विठ्ठल पाटील यांनी कोरोना संसर्गाच्या काळात वारकरी संप्रदायाची दुरवस्था झाल्याचे शासनाच्या निदर्शनास आणून दिले आणि राज्यातील कलावंतांमध्ये वारकरी संप्रदायाचा समावेश करण्याची मागणी केली होती.