मुख्यमंत्र्यांनी वीजजोडणी तोडण्याच्या आदेशाला तात्काळ स्थगिती द्यावी ! – चंद्रशेखर बावनकुळे, नेते, भाजप

भाजपचे वाढीव वीजदेयकाच्या विरोधातील आंदोलन स्थगित. येत्या २४ फेब्रुवारीपासून भाजपच्या वतीने भरमसाठ वीजदेयक वाढीच्या सूत्रांवरून ‘कारागृह भरा’ आंदोलन केले जाणार होते.

स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनंतरही पाण्याची समस्या हा गंभीर विषय ! – उद्धव ठाकरे

देशाला स्वातंत्र्य मिळून ७४ वर्षे झाली, तरी अनेक ठिकाणी पिण्यासाठी पाणी उपलब्ध होत नाही, अशी खंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पनवेल येथे २२ फेब्रुवारी या दिवशी व्यक्त केली.

पोहरादेवी येथील गर्दीच्या प्रकरणी तात्काळ गुन्हा नोंद करा ! – प्रवीण दरेकर, विरोधी पक्षनेते, विधान परिषद

मुख्यमंत्री एकीकडे ‘मास्क घाला’, असे आवाहन करतात. दुसरीकडे मात्र शेकडो समर्थकांच्या उपस्थितीत संजय राठोड गर्दी करत आहेत, हे गंभीर आहे. उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणी तात्काळ गुन्हा नोंद करावा आणि ठाकरी बाणा दाखवावा

कार्यालयीन कामाचे वेगवेगळ्या वेळांचे नियोजन आखण्यासाठी केंद्रशासनाने राष्ट्रीय धोरण आखावे !

कार्यालयीन कामाची सकाळी १० ते सायंकाळी ५ या पारंपरिक वेळेची मानसिकता पालटून वेगवेगळ्या वेळांचे नियोजन करणे आवश्यक आहे, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली.

‘लॉकडाऊन’ नको असेल, तर कोरोनाचे नियम पाळा ! – मुख्यमंत्री

‘वर्क फ्रॉम होम’ करा. येत्या काळात परिस्थिती पाहून दळणवळण बंदीचा निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला उद्देशून २१ फेब्रुवारी या दिवशी साधलेल्या संवादात सांगितले.

शासनाकडून पोलीस महासंचालकांना पत्र जाऊनही अद्याप कारवाई नाही !

श्री भवानीदेवीच्या मंदिरात भ्रष्टाचार करणार्‍यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. गुन्हे अन्वेषण यंत्रणेच्या वतीने केलेल्या चौकशीचा अहवाल घोषित करावा, दोषींना कठोर शिक्षा करावी, जेणेकरून असा अपहार भविष्यात कुणी करण्याचे धैर्य करणार नाही.

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी बंजारा समाजाचे मुख्यमत्र्यांना निवेदन  

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी वनमंत्री तथा पालकमंत्री संजय राठोड यांची विरोधक सातत्याने करत असलेली अपकीर्ती थांबबावी, यासाठी बंजारा समाजाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सहस्रो स्वाक्षर्‍यांचे निवेदन दिले.

कोरोनाशी लढतांना छत्रपती शिवरायांची प्रेरणा आणि जिद्द आम्हाला मिळते ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

छत्रपती शिवराय आपल्या सगळ्यांना जोडणारे शिवराय आहेत. छत्रपती दैवत का आहेत, तर लढण्यासाठी तलवार पकडण्याची जिगर त्यांच्यात होती. कोरोनाशी लढतांना ही प्रेरणा आणि जिद्द आम्हाला मिळत आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काढले.

ध्वनीप्रदूषण टाळण्यासाठी नियमानुसार कार्यवाही करा ! – डॉ. नीलम गोर्‍हे, उपसभापती, विधान परिषद

कायदा केवळ हिंदूंसाठीच आहे का ? अनधिकृत मंदिराठवर बळाचा उपयोग करून कारवाई करणारे पोलीस आता अजानच्या भोंग्यांच्या विरोधात कारवाई करण्याचे धारिष्ट्य दाखवतील का ?

पुणे जिल्ह्यात संचारबंदी नाही, तर जमावबंदीचे आदेश लागू ! – जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

राज्य सरकारने लागू केलेल्या कोरोनाविषयीच्या मार्गदर्शक सूचनांची कडक कारवाई चालू करण्याचे आदेश पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका, तसेच जिल्ह्याच्या ग्रामीण भागाला देण्यात आले आहेत, असे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सांगितले.