ध्वनीप्रदूषण टाळण्यासाठी नियमानुसार कार्यवाही करा ! – डॉ. नीलम गोर्‍हे, उपसभापती, विधान परिषद

पोलीस आणि प्रशासन यांना अशा सूचना का द्याव्या लागतात ? ते स्वतःहून कृती करत नसतील, तर प्रशासनाचा पांढरा हत्ती पोसायचा कशाला ?

डॉ. नीलम गोर्‍हे

मुंबई – महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ आणि पोलीस विभाग यांनी कुर्ला येथील नेहरूनगर भागातील भोंग्यांच्या ध्वनीप्रदूषणावर कार्यवाही करावी, अशा सूचना विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांनी एका बैठकीचे आयोजन करून दिल्या. मुंबई उच्च न्यायालयाने जनहित याचिका क्र. १७३/२०१० मध्ये दिलेल्या निकालपत्राचा अभ्यास करून पोलिसांनी लवकरात लवकर ध्वनीप्रदूषण न्यून करण्यासाठी योग्य कारवाई करावी, असे त्यांनी या वेळी म्हटले.

शिवसेना आमदार मंगेश कुडाळकर यांनी कुर्ला येथे होत असलेल्या भोंग्यांच्या ध्वनीप्रदूषणाविषयी निवेदन सादर केले होते. भोंग्यांच्या आवाजाची तीव्रता अधिक असल्याने स्थानिक नागरिक त्रस्त असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून वारंवार होऊनही पोलिसांनी काहीही कार्यवाही केलेली नाही, अशा आशयाचे निवेदन आमदार कुडाळकर यांनी दिले होते. (नागरिकांनी तक्रारी देऊनही कारवाई न करणार्‍या पोलिसांवर कोण कारवाई करणार ? यामुळेच जनतेचा पोलिसांवरील विश्‍वास उडालेला आहे ! – संपादक) या बैठकीला पोलीस आयुक्त आणि अन्य पोलीस अधिकारी उपस्थित होते.

भोंग्यांच्या परिसरात ध्वनीमुद्रण केले जाईल, असे सीसीटीव्ही कॅमेरे बसवा !

भोंग्यांना दिलेल्या अनुमतीची शहानिशा करून संपूर्ण शहरात ध्वनीप्रदूषण होणार नाही यासाठी शांतता समितीची बैठक घ्यावी, तसेच लोकांना विश्‍वासात घेऊन भोंग्यांची तीव्रता नियमानुसार करावी, असे डॉ. नीलम गोर्‍हे यांनी सांगितले. भोंग्यांच्या परिसरात ध्वनीमुद्रण केले जाईल, अशा पद्धतीचे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची व्यवस्था करावी, असे निर्देश डॉ. गोर्‍हे यांनी या वेळी दिले.

काय करायचे याचे ? पोलिसांना सांगून पण काही होत नाही !

अजानच्या आवाजामुळे त्रस्त झालेले अभिनेते आरोह वेलणकर यांनी सामाजिक माध्यमांवर पोस्ट टाकून व्यक्त केला संताप !

कायदा केवळ हिंदूंसाठीच आहे का ? अनधिकृत मंदिराठवर बळाचा उपयोग करून कारवाई करणारे पोलीस आता अजानच्या भोंग्यांच्या विरोधात कारवाई करण्याचे धारिष्ट्य दाखवतील का ?

अभिनेते आरोह वेलणकर

मुंबई – पठाणवाडी येथील माझ्या घरात नियमित दिवसभरातून ४-५ वेळा मशिदीमधील अजानचा इतका मोठा आवाज येतो की, त्यामुळे इथे सगळ्यांची झोपमोड होत आहे. हे कायद्याच्या विरोधात आहे. मी २ दिवसांपूर्वी पोलिसांत तक्रारही केली आहे. त्यानंतर १ दिवस आवाज बंद झाला आणि आता पुन्हा चालू झाला आहे. याचे काय करायचे ते सांगा ? पोलिसांना सांगूहनी काही होत नाही, अशी उद्विग्नता अभिनेते आरोह वेलणकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून एका संदेशाद्वारे व्यक्त केली आहे. हा संदेश त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आणि मुंबई पोलीस यांनाही टॅग केला आहे.

या संदेशामध्ये आरोह वेलणकर यांनी म्हटले आहे, मी काही दिवसांपूर्वी टिवट्रवर एक पोस्ट लिहिती होती. त्यामध्ये मी पठाणवाडी येथे मशिदीमधून होणार्‍या अजानचा आवाज माझ्या घरात आवाज येत असल्याचा उल्लेख केला होता. आता सकाळी ६ वाजता किती मोठा आवाज येत आहे, हे तुम्ही स्वत: ऐका. मला इथे राहून अडीच वर्षे झाली आहेत.