केंद्रीय गृहमंत्रालयाकडून कोरोनाविषयी नव्या मार्गदर्शक सूचना घोषित

केंद्रीय गृहमंत्रालयाकडून कोरोनाविषयी नव्या मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

कुचराई नकोच… !

लस साठवण्यासाठी जागा आणि लसीच्या वितरणाची योग्य ती कार्यपद्धत राज्यांनी बारकाईने बसवणे, हे राज्यांचे दायित्व रहाणार आहे; त्यात चुका, गोंधळ, भ्रष्टाचार आदी गोष्टी झाल्या, तर आपल्यासारखे वाईट आपणच असणार आहोत. लस मिळूनही ती जनतेपर्यंत व्यवस्थित पोचली नाही, तर ‘देव देतो आणि कर्म नेते’ असे होईल !

वर्ष २०२१ मध्येही कोरोना कायम रहाणार ! – मनोवैज्ञानिक निकोलस ऑजुला यांची भविष्यवाणी

वर्ष २०१८ मध्येच कोरोनाविषयीची भविष्यवाणी करणारे ३५ वर्षीय मनोवैज्ञानिक निकोलस ऑजुला यांनी वर्ष २०२१ मध्येही कोरोनाचा प्रभाव कायम रहाणार असल्याची नवी भविष्यवाणी केली आहे.

कोरोनाच्या वाढत्या संसर्गावर महाराष्ट्रासह ४ राज्यांना अहवाल सादर करण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

सर्वच राज्यांमध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ झाल्याचे आम्ही ऐकत आहोत. त्यामुळे सर्व राज्यांनी सद्यपरिस्थितीचा अहवाल सादर करावा. राज्यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी योग्य ती सिद्धता केली नाही, तर डिसेंबरमध्ये परिस्थिती यापेक्षाही भयंकर होऊ शकते.

प्रत्येकाला औषध लिहून देण्याची अनुमती देता येणार नाही ! – सर्वोच्च न्यायालय

आयुषच्या डॉक्टरांना केंद्र सरकारने संमत केलेले मिश्रण आणि गोळ्या रुग्णाने घेण्यासाठी लिहून देण्याच्या केरळ उच्च न्यायालयाच्या अनुमतीच्या विरोधातील सुनावणीच्या वेळी न्यायालयाने हा निर्णय दिला.

देहलीमध्ये कोरोनामुळे होणार्‍या वाढत्या मृत्यूंमुळे अंत्यसंस्कारांसाठी स्मशानामध्ये जागाच नाही !

देहलीमध्ये कोरोनामुळे १ सहस्र ४०० जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे अनेक मृतदेहांना स्मशानामध्ये जागा नसल्याने अंत्यसंस्कारापासून थांबवून ठेवण्यात आले आहे.

खासगी रुग्णालयांकडून कोरोनाबाधितांवर उपचार करतांना लुटमार ! – संसदीय समिती

अशा प्रकारे रुग्णांची लुटमार करणार्‍या रुग्णालयांवर केंद्र सरकारने कारवाई करून संबंधित रुग्णांना आणि मृत पावलेल्यांच्या कुटुंबियांना हानीभरपाई देण्यासाठी या रुग्णालयातील उत्तरदायींना बाध्य केले पाहिजे !

उत्तर भारतात कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे पुन्हा बंधने  !

देशात कोरोनाच्या संसर्गाचे वाढते प्रमाण लक्षात घेता मध्य आणि उत्तर भारतातील अनेक राज्यांत संपूर्ण दळणवळण बंदी नसली, तरी अनेक बंधने घोषित करण्यात आली आहेत.

नृसिंहवाडीतील (जिल्हा कोल्हापूर) दत्त मंदिरात नियमांचे पालन करत भाविकांकडून दर्शन

मंदिर खुले झाल्याने आजूबाजूच्या गावांमध्येही चैतन्यमय वातावरण पहावयास मिळाले.

संयुक्त अरब अमिरातकडून पाकिस्तानी नागरिकांना व्हिसा देणे बंद

संयुक्त अरब अमिरातने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान आणि इतर ११ देशांतील नागरिकांना नव्याने व्हिजिट व्हिसा देणे बंद केले आहे.