साईबाबा संस्थानने मंदिरात प्रवेश करण्याच्या संदर्भात वेशभूषेविषयी आवाहन करणारा फलक लावल्याचे प्रकरण
|
शिर्डी (जिल्हा नगर) – साईबाबा संस्थानने मंदिरात प्रवेश करतांना भारतीय संस्कृतीनुसार वेशभूषा करण्याविषयी भक्तांना आवाहन करणारा फलक लावला होता; मात्र तथाकथित सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी तो फलक हटवण्याची मागणी करत तो न हटवल्यास १० डिसेंबरला शिर्डी येथे येऊन फलक काढण्याची चेतावणी दिली आहे. त्यामुळे शिर्डी येथे ग्रामस्थांसह विविध सामाजिक संघटनांनी आक्रमक भूमिका घेत ‘भविष्यात तृप्ती देसाई यांनी असे काही केले, तर आम्ही ‘जशास तसे’ उत्तर देण्याचा निर्णय घेतला आहे’, असे म्हटले आहे. साई संस्थानने यावर कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नसून ‘आम्ही आवाहन केले आहे. त्याची सक्ती नाही’, असे त्यांचे मत आहे.