चिपळूण येथे आशुतोष बापट यांच्या ‘सफर चिपळूण गुहागर परिसराची’ या पुस्तकाचे प्रकाशन

जगाच्या पाठीवर इजिप्तची संस्कृती जुनी होती, ती काही लोकांनी गढूळ केली. आज इजिप्तमध्ये प्राचीन संस्कृती नाही. इजिप्तमधल्या मूर्ती आज आपल्याला वस्तूसंग्रहालयात दिसतात, तर भारतातील अनेक मूर्ती आजही लोकांच्या देवघरात आहेत.

जानेवारी २०२४ मध्ये मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी पूर्णपूणे खुला  होणार ! –  नितीन गडकरी, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील गोव्यातील कामे पूर्ण झाली आहेत. मुंबई-गोवा हा राष्ट्रीय महामार्ग कोकणातील प्रमुख पर्यटन स्थळांना जोडणारा महामार्ग आहे. यामुळे पर्यटन विकास आणि औद्योगिक विकासालाही चालना मिळेल.

देवस्‍थानांची आध्‍यात्‍मिकता अबाधित ठेवण्‍याचे दायित्‍व पुजारी आणि व्‍यवस्‍थापन यांचे ! – महंत श्री सुधीरदासजी महाराज

काही प्रसिद्ध देवस्‍थानांच्‍या ठिकाणी सरकारने पर्यटनाच्‍या दृष्‍टीने विकास आणि सोयीसुविधा केल्‍या असल्‍या, तरी त्‍या देवस्‍थानांच्‍या परंपरा अन् आध्‍यात्‍मिकता अबाधित ठेवण्‍याचे दायित्‍व तेथील संबंधित पुजारी, तसेच व्‍यवस्‍थापन यांचे आहे.

जिल्ह्यात येणार्‍या पर्यटकांना पोलिसांकडून कोणताही त्रास होणार नाही ! – प्रवीण पवार, महानिरीक्षक, कोकण परिक्षेत्र

सिंधुदुर्ग जिल्ह्यात गुन्हेगारीचे प्रमाण अतिशय अल्प आहे. ही कौतुकाची गोष्ट आहे. याचे सर्व श्रेय जिल्ह्यातील नागरिकांना आहे;  मात्र बाहेरील लोक येऊन या ठिकाणी गुन्हे करतात. हे प्रमाण रोखण्यासाठी प्रयत्न केले जातील.

कांदोळी-कळंगुट परिसरात ९४ टक्के ‘शॅक’ अवैध !

‘शॅक’संबंधी एका याचिकेवरून गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाने ही माहिती दिली. ‘अवैध व्यवसायावर कोणती कारवाई करणार ?’, असा प्रश्न खंडपिठाने पर्यटन खाते आणि गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळ यांना विचारला आहे.

रंकाळा तलावाच्‍या सुशोभिकरणासाठी पर्यटन विभागाकडून ४ कोटी ८० लाखांच्‍या निधीस प्रशासकीय संमती ! – राजेश क्षीरसागर

कोल्‍हापूर शहराच्‍या वैभवात भर घालणारा ऐतिहासिक रंकाळा तलावाची गेल्‍या अनेक वर्षांत दुरवस्‍था झाली आहे. या ऐतिहासिक तलावाचे सुशोभिकरण आणि संवर्धन होण्‍याच्‍या दृष्‍टीने निधी संमत करण्‍यासाठी पाठपुरावा चालू होता.

पर्यटन हा गोव्याच्या अर्थव्यवस्थेचा मुख्य स्रोत ! – पर्यटनमंत्री रोहन खंवटे

दुर्दैव म्हणजे काही आमदारदेखील गोव्यात सुरक्षित पर्यटन देण्याचा विचार न करता त्यांच्या वैयक्तिक आणि राजकीय लाभासाठी दलालांना आश्रय देत आहेत. असे करून हे निवडून आलेले लोकप्रतिनिधी गोव्याच्या पर्यटन उद्योगाला उद्ध्वस्त  करत आहेत.

परळी वैजनाथ ज्‍योतिर्लिंग स्‍थळांच्‍या सर्वांगीण विकास आणि संवर्धन यांसाठी १३३ कोटींच्‍या आराखड्यास मान्‍यता ! – मंगलप्रभात लोढा, पर्यटनमंत्री

मंत्री मंगलप्रभात लोढा म्‍हणाले की, आमचे सरकार धर्माचे रक्षण करणारे सरकार आहे. परळी वैजनाथ तीर्थक्षेत्राचे महत्त्व अल्‍प करणार नाही. ते पवित्र श्रद्धास्‍थान आहे. परळी वैजनाथाचा प्रस्‍ताव जिल्‍हाधिकार्‍यांकडून आल्‍यानंतर तो प्रस्‍ताव केंद्र सरकारला पाठवला जाईल.

विठ्ठलाकडे जाण्‍याचा ‘मार्ग’ प्रशस्‍त ! 

मंदिर परिसराच्‍या विकासासमवेत मंदिरांना भक्‍तीरस आणि धर्मशिक्षण यांची केंद्रे बनवा !

सौम्य कलमाखाली गुन्हा नोंदवणार्‍या अधिकार्‍याला निलंबित करणार ! – मुख्यमंत्री

पर्यटक जतीन शर्मा यांनी हॉटेलचा कर्मचारी रायस्टन डायस याच्या अनियंत्रित वागण्याविषयी विरुद्ध हॉटेल व्यवस्थापनाकडे तक्रार केली होती आणि याचा वचपा काढण्यासाठी रायस्टनने त्याच्या साथीदारासह जतीन शर्मा यांच्यावर प्राणघातक आक्रमण केले.