पाकच्या सीमेवरील ध्वज उतरवण्याच्या सोहळ्याला पाकच्या नागरिकांची पाठ, तर भारतियांची गर्दी कायम !

आर्थिक दिवाळखोरीमुळे झालेली पाकची ही स्थिती त्याचा अंत जवळ आल्याचेच दर्शक आहे !

पर्यटकांची लूटमार आणि फसवणूक प्रकरणी गोवा पोलीस आणि पर्यटन खाते यांची संयुक्त कारवाई

पर्यटकांची लूटमार आणि फसवणूक करणार्‍यांवर कठोरातील कठोर कारवाई केल्यासच त्यांच्यावर वचक बसेल आणि हे प्रकार टळतील !

आरे परिसरातील अतिक्रमणावर फिरणार बुलडोझर

अतिक्रमण हटवून आरे दुग्ध वसाहत परिसर पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला आहे. याचा अभ्यास करण्यासाठी शासनाने दुग्धव्यवसाय विकास विभागाच्या मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली १७ जणांची समिती स्थापन केली आहे.

पर्यटन विकासात योगदान द्या, प्रतिमास ३५ सहस्र रुपये शिष्यवृत्ती मिळवा !

राज्यातील पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी नवीन दृष्टीकोन आणि तंत्रज्ञानाची आवड असलेल्या तरुणांना महाराष्ट्र पर्यटन महामंडळाकडून प्रतिमास ३५ सहस्र रुपये शिष्यवृत्ती आणि ५ सहस्र रुपये प्रवासभत्ता दिला जाणार आहे.

कोकणात ८ ठिकाणी उभ्या रहाणार समुद्रकुटी (बीच शॅक्स)

कोकणातील स्थानिक रहिवाशांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी, या उद्देशाने ‘बीच शॅक्स’ उभारण्यात येणार आहेत. स्थानिक व्यक्तींना यात ८० टक्के जागा राखीव असतील.

पेट्रोल पंपावर इंधनासहीत हवा आणि पाणी उपलब्ध करा !

बहुतांशी पर्यटक कुटुंबासह प्रवास करत असल्याने विशेषतः महिलावर्गासाठी योग्य आणि सुरक्षित स्वच्छतागृहे २४ घंटे उपलब्ध होतील, याची दक्षता घ्यावी.

लोकमान्य टिळक जन्मस्थान सुशोभिकरणासाठी पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते झाले भूमीपूजन

सुशोभिकरण काम पूर्ण झाल्यावर स्मारकाच्या लोकापर्णानंतर लोकमान्य टिळक जन्मस्थान प्रतिदिन सकाळी ८ वाजल्यापासून रात्री ९ वाजेपर्यंत पर्यटकांसाठी खुले राहील, याविषयी आदेश काढण्याकरता जिल्हाधिकारी यांना सूचना देण्यात येतील

लोकमान्य टिळक जन्मभूमीचे  संवर्धन करा !

पुरातत्व विभागाने या दुरवस्थेकडे तात्काळ लक्ष देऊन लोकमान्य टिळक यांचे जन्मस्थान ‘राष्ट्रीय स्मारक’ घोषित करावे, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने २० नोव्हेंबर २०२१ या दिवशी समितीच्या पत्रकार परिषदेत केली होती. सविस्तर वृत्त पहा …

कोकण रेल्वे मार्गावर १२ एप्रिल ते जूनपर्यंत धावणार उन्हाळी विशेष गाड्या

या गाड्यांमुळे परराज्यातील पर्यटकांना कोकण पहाण्याची अनुभवण्याची मोठी संधी मिळणार आहे. संस्कृती, पर्यटन, जगप्रसिद्ध असलेला हापूस आंबा अनुभवायला येण्यासाठी थेट प्रवासाची संधी मिळणार आहे.

सिंहगडाच्या ‘कल्याण दरवाजा’ आणि परिसर संवर्धनाच्या कामास एप्रिलमध्ये प्रारंभ होईल ! – डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये या विषयावर चर्चा होऊन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे सांगितले होते. त्यानुसार गडाच्या विकासाकरता निधी संमत झाला आहे.