कांदोळी-कळंगुट परिसरात ९४ टक्के ‘शॅक’ अवैध !

१६७ ‘शॅक’ पैकी १५८ ‘शॅक’ अवैध !

पणजी, २७ मार्च (वार्ता.) – कांदोळी-कळंगुट परिसरात १६७ ‘शॅक’ कार्यरत आहेत आणि यांपैकी १५८ ‘शॅक’ म्हणजे जवळपास ९४.६ टक्के शॅक अवैध आहेत, अशी माहिती गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाला दिली आहे.

‘शॅक’संबंधी एका याचिकेवरून मंडळाने ही माहिती दिली. ‘अवैध व्यवसायावर कोणती कारवाई करणार ?’, असा प्रश्न खंडपिठाने पर्यटन खाते आणि गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळ यांना विचारला आहे.