गोव्यात शिगमोत्सवाला ८ मार्चपासून फोंड्यातून प्रारंभ होणार !

पर्यटन खात्याने शिगमोत्सव समित्यांसमवेत संयुक्त बैठक घेतली. सर्वांशी चर्चा करून दिनांक ठरवण्यात आले आहेत. ८ मार्चला फोंड्याहून शिगमोत्सवाला प्रारंभ होईल.

आग्वाद कारागृह संग्रहालयाची सुरक्षितता, हेलिकॉप्टर फेरी आणि कांदोळी येथील बांधाचे विस्तारीकरण यांविषयी ग्रामस्थांकडून प्रश्न उपस्थित

वारसास्थळ असलेल्या आग्वाद कारागृह संग्रहालयातील व्यवसाय, पर्यटकांसाठी चालू करण्यात आलेली हेलिकॉप्टर फेरी सेवा आणि कांदोळी येथील बांधाचे विस्तारीकरण याला विरोध करण्यात आला.

स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जन्मस्थान भगुर (जिल्हा नाशिक) पर्यटनस्थळ म्हणून घोषित करणार ! – मंगलप्रभात लोढा, पर्यटनमंत्री

येत्या पंधरा दिवसांच्या आत भगुरला अधिकृतरित्या पर्यटनस्थळ म्हणून घोषित करण्यात येईल. येथे ‘थीम पार्क’ आणि संग्रहालयासाठी पाच कोटी रुपये देत आहोत, अशी घोषणा पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी या वेळी केली.  

आग्वाद किल्ला संग्रहालयातील मद्यविक्री केंद्र कायमस्वरूपी बंद झाल्याविषयी सुस्पष्टता नाही

मद्यविक्री केंद्र चालवणार्‍या मालकाच्या मते करारानुसार संग्रहालयातील स्वागतकक्षात खाद्य आणि पेय यांचे प्रदर्शन अन् विक्री करता येते.

ब्रिटनच्या पंतप्रधानांचे कुटुंब पर्यटनासाठी गोव्यात

बाणावली किनार्‍यावर काही पत्रकारांनी अक्षता मूर्ती यांची भेट घेतली असता त्या म्हणाल्या, ‘‘गोवा पुष्कळ सुंदर आहे. येथील वातावरण मला पुष्कळ आवडते. आम्ही सुट्टीत निवांतपणा अनुभवण्यासाठी येथे आलो आहोत.’’

तीर्थक्षेत्रांविषयी राजकारण्यांचे नव्हे, धर्मशास्त अभ्यासकांचे मत ग्राह्य धरावे ! – सुधीर मुनगंटीवार, सांस्कृतिक कार्यमंत्री

इतिहास, धर्मशास्त्र, तीर्थक्षेत्र यांविषयी राजकीय व्यक्तींनी भाष्यच करू नये. हा अधिकार ऐतिहासिक तथ्यांचा अभ्यास करणार्‍यांचा किंवा धर्मशास्त्राच्या अभ्यासकांचा आहे- सुधीर मुनगंटीवार

बेतुल किल्ल्याचे (गडाचे) संवर्धन करून तेथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारावा ! – केपेचे काँग्रेसचे आमदार आल्टन डिकोस्ता

सरकारने हा गड ‘वारसास्थळ’ म्हणून घोषित केला आहे; मात्र किल्ल्याची तातडीने डागडुजी करणे आवश्यक आहे. या किल्ल्यावरून साळ नदी अरबी समुद्राला मिळत असल्याचे विहंगम दृश्य दिसते.

शॅकधारकांकडून समुद्रकिनार्‍यांवर अवैधरित्या कुपनलिका आणि शौचालयांचे ‘सोक पिट’

कांदोळी आणि कळंगुट किनारपट्टी भागांत मोठ्या प्रमाणावर पर्यावरण नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळले आहे. कुपनलिका खोदल्याने आणि शौचालयाचे शोष खड्डेही खोदल्याचे आढळून आले आहे.

‘वंदे भारत’ एक्‍सप्रेस १० फेब्रुवारीपासून मुंबई ते शिर्डी धावणार !

यापूर्वी महाराष्‍ट्रात नागपूर ते बिलासपूर आणि मुंबई ते गांधीनगर या २ मार्गांवर ‘वंदे भारत’ एक्‍सप्रेस धावत आहेत. मुंबई ते शिर्डी हे अंतर कापण्‍यासाठी या एक्‍सप्रेसला ६ घंटे लागतील.

गोवा पर्यटन खात्याकडून नव्याने मार्गदर्शक सूचना प्रसारित

गोवा पर्यटन खात्याने पर्यटक उद्योगाला भेडसावणार्‍या विविध समस्यांवर तोडगा काढण्याच्या दृष्टीने नव्याने प्रसारित केलेल्या मार्गदर्शक सूचना . . .