आतंकवादावर निर्णायक कारवाई करणे आवश्यक ! – पंतप्रधान मोदी

आतंकवादावर निर्णायक कारवाईसाठी भारतानेच पुढाकार घेऊन पाकला संपवणे आवश्यक आहे. ‘अन्य कुणाकडून ही कारवाई होईल’, अशी भ्रामक अपेक्षा न करता आता हे स्वतःचेच दायित्व असल्याचे लक्षात घेऊन भारतानेच हे करणे आवश्यक आहे !

इस्रायलची गुप्तचर संस्था ‘मोसाद’ने इराणमध्ये घुसून आतंकवादी आक्रमणचा कट हाणून पाडला !

छोटासा इस्रायल असे करू शकतो, तर गेली ३३ वर्षे पाकपुरस्कृत आतंकवादाचा सामना करणारा भारत असे का करू शकत नाही ?

 ‘७२ हुरें’ चित्रपटाचा ‘ट्रेलर’ अनुमतीविना प्रदर्शित !

इस्लाममधील संकल्पनेवर आधारित चित्रपटाचे विज्ञापन करणार्‍या व्हिडिओला (‘ट्रेलर’ला) अनुमती नाकारणारे केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळ हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्‍या ‘आदिपुरुष’ चित्रपटाला सहज अनुमती देते, हे लक्षात घ्या !

(म्हणे) ‘अमेरिकेने भारतधार्जिणी वक्तव्ये करू नयेत !’  – पाकिस्तान

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी पाकविरुद्ध प्रसारित केलेल्या संयुक्त निवेदनामुळे पाकचा जळफळाट ! 

बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या दोन गटांतील हाणामारीत एका कार्यकर्त्याचा मृत्यू

बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट कधी लागू होणार ?

हिंदू आणि शीख यांच्यात फूट पाडण्यासाठीच काँग्रेसकडून खलिस्तानवादाला खतपाणी !

‘रॉ’चे माजी सचिव जी.बी.एस्. सिद्धू यांचा गंभीर आरोप !
भिंद्रनवाले याला काँग्रेसने केले मोठे !

पेशावर (पाकिस्तान) येथे शिखांवरील आक्रमणांच्या २ घटनांत १ जण ठार, तर दुसरा घायाळ  

पाकिस्तानचे साहाय्य घेऊन स्वतंत्र खलिस्तानची मागणी करणारे याविषयी का बोलत नाहीत ? अशा घटना त्यांना मान्य आहेत का ?

पाकिस्तानने त्याच्या भूमीचा वापर आतंकवादी आक्रमणासाठी होणार नाही, याची काळजी घ्यावी !

पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचे संयुक्त निवेदन !

आतंकवाद मोडून काढण्यासाठी योग्य पद्धतीने लढावे लागेल !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अमेरिकेच्या संसदेत प्रतिपादन !

तमिळनाडू आतंकवाद्यांचा कारखाना होत आहे ! – पाळा संतोष कुमार, संस्थापक अध्यक्ष,  हिंदू येलूच्ची पेरवाई, तमिळनाडू

हिंदुत्वाचे कार्य करणार्‍यांना खोट्या खटल्यांमध्ये गुंतवून अटक करण्यात येत आहे. धर्मकार्यावरील हे आघात आम्हाला हिंदुत्वाचे कार्य करण्यासाठी प्रेरणा देत आहेत.विवेकानंद यांनी युवकांना जागरूक केले, त्याप्रमाणे संघटनेद्वारे युवकांमध्ये जागृती निर्माण करण्याचे कार्य चालू आहे, असे उद्गार त्यांनी काढले