Kashmir Hindu Attacked : काश्मीरमधील अनंतनागमध्ये काश्मिरी हिंदु कुटुंबातील महिलांना अमानुष मारहाण !

श्रीनगर – कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये शांततेचे वातावरण आहे.  हळूहळू विस्थापित काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन चालू झाले. काश्मिरी हिंदु असलेले संजय वाली आणि त्यांचे कुटुंब अनेक वर्षांनी अनंतनागमध्ये परतले होते आणि वेरीनाग येथे त्यांनी त्यांच्या भूमीवर घर बांधणे चालू केले होते. संजय वाली आणि त्यांच्या कुटुंबियांची गेल्या काही वर्षांची भीती नाहीशी झाली होती; मात्र लोकसभा निवडणुकीचा निकाल घोषित झाल्यानंतर अवघ्या २४ घंट्यांत संजय वाली यांच्या कुटुंबियांना मारहाण करण्यात आली. त्यांना तेथून निघून जाण्याची धमकी मिळाली आहे. या घटनेचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित  झाला असून अनेकांनी या घटनेविषयी अप्रसन्नता व्यक्त केली जात आहे. (हे पोलीस आणि प्रशासन यांना लज्जास्पद ! – संपादक)

संजय वाली यांनी सांगितले की, निवडणुकीचा निकाल आल्यानंतर काही लोक त्यांच्या घरासमोर आले आणि त्यांनी शिवीगाळ केली. कुटुंबातील महिलांवर आक्रमण करून त्यांना मारहाण केली. त्यांनी बांधलेले घर पाडण्यात आले. तेथील बांधकाम साहित्य फेकून देण्यात आले. ‘या घटनेनंतर मला पुन्हा  वर्ष १९९० सारख्या दुर्घटनेला सामोरे जावे लागण्याची भीती वाटत आहे’, असे संजय वाली यांनी सांगितले.


१९९० मध्ये काय झाले होते ?

१९९० मध्ये काश्मीरमध्ये जिहादी आतंकवाद्यांनी काश्मिरी हिंदूंचा शिरच्छेद केला. तेथे मोठ्या प्रमाणात हिंदूंना नरसंहार केला. अनेक हिंदु महिलांवर बलात्कार केले. अनेक मंदिरे पाडली. शेेवटी जीव वाचवण्यासाठी हिंदूंना सर्व काही सोडून काश्मीरमधून पलायन करावे लागले होते. या काळात अनुमाने ४ लाख काश्मिरी हिंदूंना त्यांची घरे सोडून आपल्याच देशात निर्वासित व्हावे लागले होते.

संपादकीय भूमिका

काश्मीरमध्ये आजही जिहादी आतंकवाद अस्तित्वात असल्याचेच यावरून सिद्ध होते. सरकार जिहादी आतंकवादाचा संपूर्ण बीमोड केव्हा करणार आहे ?