टोरंटो (कॅनडा) – कॅनडाने भाषणस्वातंत्र्याच्या नावाखाली भारतविरोधी घटकांना हवे तसे करू दिल्याची घटना पुन्हा एकदा घडली आहे. अमृतसर येथील सुवर्ण मंदिरात भारतीय सैन्याने ६ जून १९८४ या दिवशी केलेल्या ‘ऑपरेशन ब्लू स्टार’ला ४० वर्ष पूर्ण झाल्यावरून कॅनडात खलिस्तान समर्थकांनी निदर्शने केली. या वेळी दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येचा गौरव करणारा एक चित्ररथ खलिस्तान समर्थकांनी व्हँकुव्हर शहरामधील भारतीय वाणिज्य दूतावासासमोर नेला. यामध्ये इंदिरा गांधी यांचे छायाचित्र गोळ्या झाडल्याने छिन्नविछिन्न झाल्याचे दाखवण्यात आले आहे. निदर्शनांच्या वेळी भारतविरोधी घोषणाबाजी करण्यात आली. याखेरीज भारत आणि रशिया यांचे राष्ट्रध्वजही जाळण्यात आले.याविषयी दूतावासातील एका वरिष्ठ भारतीय अधिकार्याने सांगितले की, या प्रकरणी तक्रार नोंदवली जाईल.
Khalistanis burn Indian Flag and Russian Flag outside the Indian Embassy in Canada#Khalistanis#CanadaNews #India pic.twitter.com/iDMbFOotDo
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 7, 2024
(ही छायाचित्रे / व्हिडिओ देण्यामागे कुणाच्याही राष्ट्रीय भावना दुखावण्याचा आमचा उद्देश नसून राष्ट्रद्रोह्याने केलेले विडंबन कळावे, या उद्देशाने हे प्रसिद्ध केले आहे. – संपादक)
खलिस्तानी आतंकवादी गुरपतवंत सिंह पन्नू याच्या हत्येचा कट रचण्यामध्ये भारतीय नागरिक सहभागी असल्याचा कोणताही विश्वासार्ह पुरावा अमेरिकेने दिलेला नाही, असे रशियाने मे महिन्यात दिलेल्या निवेदनात म्हटले होते. याद्वारे रशियाने भारताची बाजू घेतली होती. त्यामुळेच खलिस्तान्यांनी रशियाचे राष्ट्रध्वज जाळला.