SC Advocate J. Saidipak : भारतात ज्या मंदिरांवर मशिदी बांधण्यात आल्या तेथे परत मंदिरे उभारू !

आम्ही आमची मंदिरे पाडून बांधलेली सर्व जागा कायदेशीर लढा देऊन मोकळी करू, असे विधान अधिवक्ता जे. साईदीपक यांनी केले आहे.

Jagatguru Swami Rambhadracharya Maharaj : मंदिरांच्या सूत्रांवर आपला संघर्ष चालूच रहाणार !

मंदिरांविषयी संतांना जे वाटते आणि ते जी आज्ञा करतात त्याचे पालन हिंदू अन् त्यांच्या संघटना यांनी करण्यातच त्यांचे भले होणार आहे !

बरेली (उत्तरप्रदेश) येथील ४० वर्षांपूर्वी मुसलमानाने बळकावलेल्या मंदिरावर हिंदूंनी फडकवला भगवा ध्वज !

बरेली येथे काही दिवसांपूर्वी अनेक वर्षे बंद असणारे हिंदु मंदिर सापडले होते. हिंदु संघटनांनी आता ते उघड केल्यानंतर तेथे फडकणारा इस्लामी ध्वज काढून भगवा ध्वज लावला आहे.

Well Found In Sambhal : संभल (उत्तरप्रदेश) येथे १५० वर्षे जुनी बावडी (पायर्‍या असणारी मोठी विहीर) सापडली !

पुरातत्व विभागाच्या पथकाने संभलच्या कल्की मंदिराची पहाणी केली. या पथकाने मंदिराचा घुमट, भिंतींवर केलेले कोरीव काम आणि संकुलाची छायाचित्रे काढली आणि चित्रीकरण केले. 

Claim Ajmer Dargah As Shiva Temple : अजमेरचा दर्गा हे शिवमंदिर आहे; आम्ही ते परत घेऊ ! – अखिल भारतीय हिंदु सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विष्णु गुप्ता

भारतातील वादग्रस्त मशिदी आणि दर्गे यांचे सर्वेक्षण करून तेथे पूर्वी मंदिरे असल्यास ते हिंदूंना सोपवण्यासाठी आता केंद्र सरकारने पावले उचलणे आवश्यक !

Kanpur 5 Temples Freed Out of 120 : कानपूरमध्ये मुसलमानबहुल भागात बंद आणि अतिक्रमित आहेत १२० मंदिरे !

कानपूरच्या महापौरांनी मुसलमानबहुल भागांत जाऊन ही मंदिरे मुक्त केली. हे कौतुकास्पद आहे. अन्य शहरांतील, हिंदु संघटनांनी अशा बंद असणार्‍या मंदिरांचा शोध घेऊन त्यांच्या रक्षणासाठी सरकारवर दबाव निर्माण करणे आवश्यक आहे !

संपादकीय : जागरूक हिंदूंचा निर्णय !

भाविकांच्या समस्यांवर उपाय म्हणून महाजनांनी, समाजाच्या प्रतिनिधींनी जागरूक राहून सूज्ञपणे घेतलेल्या निर्णयाला हिंदूंनीच आता जागरूक राहून प्रभावी संघटनाद्वारे चुकीच्या कृत्यांना जोरकसपणे विरोध करावा आणि मंदिरांचे पावित्र्य रक्षण करावे !

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी निर्माण केलेला वारसा जतन करणे आवश्यक !

आपण अहिल्याबाईंनी उभारलेली मंदिरे, विहिरी, कुंड, तलाव यांची देखभाल केली, तर एक शासक कसा असावा, हे येणार्‍या पिढीला शिकायला मिळेल. आम्ही हा इतिहास येणार्‍या पिढीला सांगितला नाही, तर आपली संस्कृती आपण गमावून बसू.

Muzaffarnagar Shiva Temple : मुझफ्फरनगर (उत्तरप्रदेश) येथील मुसलमानबहुल भागातील मंदिर हिंदूंच्या पलायनामुळे बंद !

मुझफ्फरनगर येथील मुसलमानबहुल भागात एक शिवमंदिर सापडले आहे. हे शिवमंदिर वर्ष १९७० मध्ये बांधण्यात आले होते; मात्र या भागात मुसलमानांची संख्या वाढल्याने हिंदूंना पळून जावे लागले आणि मंदिर पूर्णपणे मोडकळीस आले.

Aligarh Shiva Temple : अलीगड (उत्तरप्रदेश) येथे मुसलमानांनी नियंत्रणात घेतलेले मंदिर हिंदूंनी केले मुक्त !

अलीगड येथील मुसलमानबहुल सराय रहमान भागात १८ डिसेंबर या दिवशी ५० वर्षांहून अधिक जुने शिवमंदिर सापडले. हे मंदिर अनेक वर्षे बंद होते. अखिल भारतीय करणी सेना आणि बजरंग दल या संघटनांना याची माहिती मिळताच त्यांचे कार्यकर्ते तेथे पोचले आणि त्यांनी मंदिर उघडण्याचा प्रयत्न केला.