संपादकीय : जागरूक हिंदूंचा निर्णय !

गोव्यातील हिंदूंनी मंदिरांतील उत्सवांमध्ये हिंदुविरोधी कारवाया करणार्‍यांना व्यवसाय करू न देण्याचा केला ठराव ! (चित्र सौजन्य : prudent media)

गोव्यातील हिंदूंनी मंदिरांतील उत्सवांमध्ये हिंदुविरोधी कारवाया करणार्‍यांना व्यवसाय करू न देण्याचा ठराव ब्रह्माकरमळीच्या हिंदु संमेलनात करण्यात आला, तसेच फोंड्यात झालेल्या ‘हिंदू रक्षा समिती’च्या सभेतही गोहत्या करणार्‍यांना मंदिर परिसरात व्यवसायास अनुमती देणार नसल्याची प्रतिज्ञा घेण्यात आली. याच्या २-३ दिवस आधीच गोव्यातील फातर्पा येथील शांतादुर्गा फातर्पेकरीण देवस्थानच्या महाजनांनी मुसलमानांना जत्रेत ‘स्टॉल’ लावण्यास मनाई केली. यामुळे अनेकांना पोटशूळ उठला आहे. ‘खरा धर्म माणुसकीचा आहे, देवीची सर्वांवर कृपा आहे, असा निर्णय घेतांना मुसलमान बांधवांच्या पोटाचा विचार व्हावा….’, वगैरे अनेक शब्दच्छल करणारे लेख, प्रतिक्रिया काहींनी प्रसारित केल्या आणि याला ‘कट्टर हिंदुत्ववाद’, ‘कट्टर हिंदुत्वनिष्ठांचा दबाव’, असेही म्हटले आहे.

अलीकडे अन्नात थुंकण्याचे, लघवी करण्याचे, रसायन मिसळण्याचे अनेक व्हिडिओ समोर येतात. ते कोण आहेत ? हेही त्यात दिसतेच. त्यामुळे साधा किराणा, फळे, भाज्या घ्यायच्या म्हटले, तरी हिंदु भीती बाळगूनच अगदी निरखून खरेदी करतो. घरी आल्यावर त्याची आधुनिक पद्धतीने शुद्धी प्रक्रिया करतो, ती वेगळीच ! प्रतिदिन खाण्या-पिण्याच्या पदार्थांमध्ये अशी सतर्कता बाळगावी लागत आहे, तर मुळातच हिंदूंच्या देवतांना न मानणारे, त्यांचा द्वेष करणारे मंदिर परिसरात ‘स्टॉल’ लावतांना काय करत असतील ? असा विचार साहजिकच श्रद्धाळू भाविकांच्या मनात आल्यावाचून रहाणार नाही. देवतेला अर्पण करायचे ते सर्व म्हणजे शरीर, मन, पूजासाहित्य, फळे ही शुद्ध असावीत, यासाठी प्रत्येकच हिंदु भाविक प्रयत्नशील असतो. तो भल्या पहाटे उठून स्नान करून शरीरशुद्धी करण्यासह स्तोत्रपठण करून मनाच्या शुद्धीसाठीही प्रयत्नरत असतो. अशा वेळी देवाला अर्पण करायच्या वस्तू, फळे यांमध्ये कुठल्याही प्रकारची भेसळ स्वीकारार्ह ठरेल का ? त्यामुळे मंदिरांचे पावित्र्य राखण्यासाठी आणि भाविकांच्या दृष्टीने महाजन अन् जागरूक हिंदू यांनी घेतलेला निर्णय योग्यच आहे.

आध्यात्मिक पर्यटनाच्या दृष्टीने…

गोवा राज्यात आध्यात्मिक पर्यटनाला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. राज्यशासनही त्यासाठी प्रयत्नरत आहे. अशा परिस्थितीत मंदिरांचे पावित्र्य टिकून राहिले, तेथील धार्मिकता जपली गेली, तर आध्यात्मिक पर्यटनाच्या दृष्टीनेही ते महत्त्वाचे ठरणार आहे. धार्मिकता जपणारी, पवित्र आणि स्वच्छ मंदिरे ही गोव्याची खरी ओळख आहे. ती टिकवून ठेवण्यासाठी हिंदू योग्य तो निर्णय घेत आहेत, ही हिंदूंच्या चांगल्या भवितव्याची पायाभरणी आहे.

हिंदूंची मंदिरे ही धार्मिक स्थळे आहेत. त्यामुळे मंदिरांचे पावित्र्य टिकवण्यासाठी मंदिराची आणि त्याच्या परिसराची धार्मिकता जपली गेली पाहिजे. हिंदूंच्या देवतांना न मानणार्‍यांकडून मंदिरांची धार्मिकता जपली जाईल का ? मुळात या साध्या प्रश्नाचे उत्तर ‘त्या’ स्टॉलधारकांनीच द्यायला हवे. उत्सवाच्या वेळी मुसलमानांना स्टॉल न लावू दिल्याने त्यांच्या पोटावर अन्याय होतो, असे काहींचे म्हणणे आहे. त्यांना पोटा-पाण्यासाठीच स्टॉल लावायचा आहे, तर तो कुठेही लावता येतो. संपूर्ण गोवा राज्यात मंदिरांचे परिसर, उत्सव एवढीच ठिकाणे त्यासाठी हवीत कशाला ? आणि उत्सवांत जर त्यांनी स्टॉल लावला नाही, तर त्यामुळे अशी किती हानी होणार आहे ? व्यवसायच करायचा आहे, तर राज्यात अनेक मोठमोठे कार्यक्रम होत असतात. तेथे जाण्यापासून त्यांना कुणी अडवले आहे ? त्यांच्या उपजीविकेची काळजी करणार्‍यांनी मुख्यमंत्र्यांना पत्रे लिहिण्यापेक्षा त्यांनी स्वतःच त्यांच्या व्यवसायात साहाय्य करायला नको का ? ‘आपल्याच देशात आपल्याच बांधवांना व्यवसायापासून दूर केले जाते’, असे सांगून समाजाची दिशाभूल करणार्‍यांनी ‘ते’ भारतातीलच आहेत का ? याचे सर्वेक्षण करून त्याची आधी निश्चिती करावी.

सर्वधर्मसमभावाची भलावण कशाला ?

‘बांगलादेशातील घटनांना तापवून हिंदु संघटना मुसलमानांप्रती द्वेष पसरवत आहेत’, असे ज्यांना वाटते, त्यांनी कट्टरता काय असते ? हे अनुभवण्यासाठी आताच्या परिस्थितीत बांगलादेशाचा एखादा दौरा करायला हरकत नाही. हिंदूंच्या संघटना या कुणाप्रती द्वेष पसरवत नसून त्या हिंदूंना जागृत करण्याचे कार्य करत आहेत. त्यांच्या कार्याला ‘दहशत’ अथवा ‘दबाव’, अशी नाहक विशेषणे लावून कथित विवेकी आणि बुद्धीवादी कुणाचे पोट भरत आहेत ? छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यातील मुसलमानांची उदाहरणे देऊन आणि महाराज सर्वधर्मसमभावी असल्याचे दाखवून हिंदूंना मूर्ख बनवण्याचे कारस्थान आता तरी थांबवलेच पाहिजे; कारण हिंदू आता जागृत होत आहेत, त्यांना त्यांच्यावर होत असलेले अत्याचार कळू लागले आहेत. त्यामुळे ते योग्य निर्णय घेत आहेत. ही देवतांची हिंदूंवरील कृपाच आहे. सौदी अरेबियामध्ये प्रवेश करतांनाच हिंदु, ख्रिस्ती किंवा अन्य कुणालाही स्वतःची धार्मिक प्रतीके समवेत बाळगता येत नाही. ती विमानतळावरच काढून घेतली जातात, भारतात मात्र तसे नाही. हिंदूच खरे सहिष्णु असल्याने त्यांनी स्वतःच्या देशात सर्वांना संधी दिलेली आहे. मुसलमानांना त्यांची प्रत्येकच गोष्ट ‘हलाल’ म्हणजे ‘त्यांच्या दृष्टीने पवित्र’ लागते. त्यासाठी त्यांची थुंकण्याची कृती ही त्यांची ‘धार्मिकता’ असेल, तर हिंदूंनी जागरूक राहून केलेली कृती ‘कट्टरतावाद’ कशी ? मुळातच हिंदूंनी कधीच आपपरभाव केला नाही; परंतु अनेक शतके भारतावर मोगलांनी केलेल्या आक्रमणांमुळे हिंदूंना ‘भेद’ लक्षात घ्यावा लागत आहे. त्यामुळे हिंदूंना ‘सर्वधर्मसमभाव’ आणि ‘मानवता’ यांचे उपदेश देणे आता तरी बंद करावे. कथित विवेकी आणि बुद्धीवादी लोकांची कामे बंद पडल्याने त्यांच्याकडे ‘सर्वधर्मसमभाव’ सोडून अजून कुठलेही सूत्र शिल्लक राहिलेले नाही. त्यामुळे नुकत्याच घडलेल्या घटनांचा नको तो संदर्भ देऊन त्याच आधारावर हिंदूंचा बुद्धीभेद करून मंदिरांमध्ये, महाजनांमध्ये आणि पर्यायाने हिंदूंमध्ये दुफळी निर्माण केली जात आहे. त्यांच्या या प्रयत्नांकडे जागरूक हिंदू अर्थात्च दुर्लक्ष करतील; परंतु अशांना हिंदूंनी सनदशीर मार्गाने वेळीच विरोध करणे आवश्यक आहे.

भाविकांच्या समस्यांवर उपाय म्हणून महाजनांनी, समाजाच्या प्रतिनिधींनी जागरूक राहून सूज्ञपणे घेतलेल्या निर्णयाला सर्मधर्मसमभावाच्या पारड्यात तोलणार्‍यांचे खरे वास्तव माता शांतादुर्गेने हिंदूंना दाखवलेले आहेच. त्यामुळेच हिंदूंनी योग्य तो निर्णय घेतला आहे. हिंदूंनीच आता जागरूक राहून प्रभावी संघटनाद्वारे चुकीच्या कृत्यांना जोरकसपणे विरोध करावा आणि मंदिरांचे पावित्र्य रक्षण करावे !

जागरूक हिंदूंच्या कृतीला ‘कट्टरता’ ठरवणारे अन्य धर्मियांच्या ‘धार्मिकते’वर कधी आक्षेप घेतात का ?