Amethi Muslims Occupied ShivaTemple : अमेठीमध्ये मुसलमानबहुल भागात २० वर्षांपासून मुसलमानांकडून शिवमंदिरावर नियंत्रण

उत्तरप्रदेशामध्ये आता प्रशासनानेच सर्वच मुसलमानबहुल भागांमध्ये मंदिर शोधण्याची मोहीम राबवून ती मुक्त करणे आवश्यक आहे. त्यांच्याकडून आदर्श घेऊन संपूर्ण देशात ही मोहीम चालू केली पाहिजे !

संपादकीय : मंदिरमुक्तीचा यज्ञ !

हिंदूंची मंदिरे मुक्त करण्यासह संतांच्या मार्गदर्शनानुसार संघर्ष करण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे !

मंदिर न्यास परिषदेत संत, मंदिरांचे विश्वस्त आणि मान्यवर यांचे उद्बोधन

शिर्डी मतदारसंघ हा ऐतिहासिक आहे. सरकारच्या माध्यमातून मंदिर संस्कृतीचा उद्धार होत नाही. अंबामातेचे पांडवकालीन मंदिर आहे; पण ते सरकारच्या कह्यात आहे. सरकार स्वत: काही करत नाही आणि लोकांनाही काही करू देत नाही.

मंदिर महासंघाने आतापर्यंत केलेले कार्य, त्याची संघर्षात्मक वाटचाल आणि मिळालेले यश !

मंदिर संस्कृती रक्षणार्थ महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक येथे स्थापन झालेल्या मंदिर महासंघाच्या कार्याचा आढावा पहात असतांना २४ डिसेंबर या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘महाराष्ट्र राज्यात मंदिर महासंघाने केलेले कार्य आणि आंदोलने’, यांविषयी वाचले. आज या लेखाचा पुढचा भाग येथे देत आहोत.                         

भैरवनाथ आणि देवांचा प्रदक्षिणा सोहळा उत्साहात पार पडला !

गोडोली येथील श्री भैरवनाथ आणि श्री जोगेश्वरीदेवीची ग्रामप्रदक्षिणा मोठ्या उत्साहात पार पाडली. सहस्रो भाविकांनी या मंगल सोहळ्यासाठी गर्दी केली होती. गोडोली येथील श्री भैरवनाथ मंदिराचा जीर्णोद्धार झाला आहे.

मंदिर महासंघाने आतापर्यंत केलेले कार्य, त्याची संघर्षात्मक वाटचाल आणि मिळालेले यश !

वर्ष २००८ पासून मंदिरांच्या रक्षणार्थ महाराष्ट्रात आणि अन्य काही राज्यांमध्ये मंदिर रक्षणार्थ चळवळ चालू आहे. वर्ष २००८ मध्ये तत्कालीन काँग्रेस सरकार महाराष्ट्रातील साडेचार लाख मंदिरे कह्यात घेऊन त्याचे सरकारीकरण करण्यात येणार होते….

SC Advocate J. Saidipak : भारतात ज्या मंदिरांवर मशिदी बांधण्यात आल्या तेथे परत मंदिरे उभारू !

आम्ही आमची मंदिरे पाडून बांधलेली सर्व जागा कायदेशीर लढा देऊन मोकळी करू, असे विधान अधिवक्ता जे. साईदीपक यांनी केले आहे.

Jagatguru Swami Rambhadracharya Maharaj : मंदिरांच्या सूत्रांवर आपला संघर्ष चालूच रहाणार !

मंदिरांविषयी संतांना जे वाटते आणि ते जी आज्ञा करतात त्याचे पालन हिंदू अन् त्यांच्या संघटना यांनी करण्यातच त्यांचे भले होणार आहे !

बरेली (उत्तरप्रदेश) येथील ४० वर्षांपूर्वी मुसलमानाने बळकावलेल्या मंदिरावर हिंदूंनी फडकवला भगवा ध्वज !

बरेली येथे काही दिवसांपूर्वी अनेक वर्षे बंद असणारे हिंदु मंदिर सापडले होते. हिंदु संघटनांनी आता ते उघड केल्यानंतर तेथे फडकणारा इस्लामी ध्वज काढून भगवा ध्वज लावला आहे.

Well Found In Sambhal : संभल (उत्तरप्रदेश) येथे १५० वर्षे जुनी बावडी (पायर्‍या असणारी मोठी विहीर) सापडली !

पुरातत्व विभागाच्या पथकाने संभलच्या कल्की मंदिराची पहाणी केली. या पथकाने मंदिराचा घुमट, भिंतींवर केलेले कोरीव काम आणि संकुलाची छायाचित्रे काढली आणि चित्रीकरण केले.