गोव्यात गेल्या ४ वर्षांत व्यावसायिकांनी १ सहस्र ६०० कोटी रुपयांचा ‘वस्तू आणि सेवा कर’ बुडवला
राज्यात मागील ४ आर्थिक वर्षांत १ सहस्र ५९९ कोटी ४२ लाख रुपयांचा ‘वस्तू आणि सेवा कर’ (‘जी.एस्.टी.’) बुडवल्याचे उघडकीस आले आहे. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी ही माहिती दिली आहे.