मालमत्ताकर, पाणीपट्टी ‘ऑनलाईन’ भरण्याचे महानगरपालिकेचे आवाहन

नवी मुंबई, २४ मार्च (वार्ता.) –  कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने ३१ मार्चपर्यंत ‘लॉकडाऊन’ घोषित केला असून या कालावधीत नागरिकांच्या आरोग्य हिताच्या दृष्टीने न्यूनतम संपर्कात येणे, त्याचप्रमाणे गर्दी टाळणे आवश्यक आहे. या दृष्टीने नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, आपले स्वत:चे आणि इतरांचे आरोग्य जपण्यासाठी मालमत्ताकर, पाणीपट्टी, तसेच महानगरपालिकेशी संबंधित इतर गोष्टी नवी मुंबई महानगरपालिकेचे संकेतस्थळ www.nmmc.gov.in यावर अथवा महानगरपालिकेचे ‘nmmc e conect’ मोबाईलद्वारे ऑनलाईन पद्धतीने करावा. सामाजिक आरोग्य हिताच्या दृष्टीने नागरिकांनी प्रत्यक्ष संपर्क न साधता ऑनलाईन पद्धतीचा वापर करावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे.