बिलीव्हर्स ईस्टर्न चर्च आणि के.पी. योहानन यांची सर्व संपत्ती जप्त करा !

आंतरराष्ट्रीय हिंदु परिषद तथा राष्ट्रीय बजरंग दल यांची मागणी

नवी देहली – राष्ट्रीय बजरंग दलाचे केरळचे सरचिटणीस विपिन लालजी यांच्या नेतृत्वाखाली १४ नोव्हेंबर या दिवशी बिलीव्हर्स ईस्टर्न चर्चच्या तिरुवल्ला मुख्यालयाजवळ निषेध मोर्चा काढण्यात आला. या वेळी आंतरराष्ट्रीय हिंदु परिषदेचे केरळ सरचिटणीस श्रीहरि पलोड उपस्थित होते. या वेळी के.पी. योहानन यांना अटक करून त्यांची आणि या चर्चची संपूर्ण संपत्ती जप्त करण्याची मागणी करण्यात आली. ‘योहानन हे देशविरोधी शक्तींचे हस्तक असून ते आर्थिक गैरव्यवहार आणि बलपूर्वक धर्मांतर करतात’, असा आरोपही करण्यात आला.

 (सौजन्य : TIMES NOW)