गोव्यात कोरोनाग्रस्त राज्यांतील पर्यटक आल्यामुळे गोमंतकियांना धोका !

कळंगुट समुद्रकिनार्‍यावर असलेल्या पर्यटकांच्या गर्दीत ना मास्कचा वापर, ना सामाजिक अंतराच्या नियमाचे पालन !

भाजपचे गोवा प्रभारी सी.टी. रवि गोव्यात : म्हादईवर भाष्य करण्यास नकार

गोवा शासनाने म्हादई प्रश्‍नी कर्नाटक राज्याच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात अवमान याचिका प्रविष्ट केली आहे.

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे पुणे शहरातील सर्व शाळा तूर्तास बंद

कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता पुणे शहरातील सर्व शाळा १३ डिसेंबरपर्यंत बंद .

हिंदूंनी स्वतःचे आणि स्वतःच्या कुटुंबाच्या रक्षणासाठी स्वरक्षण प्रशिक्षण शिकणे आवश्यक ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

आजची स्थिती पाहिली, तर हिंदु युवक-युवती पाश्‍चात्त्यांच्या अंधानुकरणामुळे धर्मापासून दूर जात आहेत. त्यामुळे त्यांचे बौद्धिक धर्मांतर होत असल्याचे लक्षात येत आहे.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नांदेड आणि परभणी येथील धर्मप्रेमींसाठी ‘ऑनलाईन’ शौर्यजागृती व्याख्यानाचे आयोजन

महिलांवरील अत्याचार आणि आक्रमणे यांमध्ये वाढ झालेली आहे. अशा परिस्थितीमध्ये हिंदु महिला, युवती आणि समाज यांच्यात शौर्य जागृत व्हायला हवे.

सनातनचा बालसाधक कु. यशराज देशमुख पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात १३ वा

सनातनचा बालसाधक कु. यशराज सुर्यकांत देशमुख हा महाराजा सयाजीराव गायकवाड विद्यालयात इयत्ता ५ वीमध्ये शिकत आहे. फेब्रुवारी मासामध्ये झालेल्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत २८८ पैकी २६२ गुण मिळवून कु. यशराज याने राज्यात १३ वा क्रमांक मिळवला आहे.

(म्हणे) ‘राजभवनातील मशीद नमाजासाठी उघडा !’ – रझा अकादमी

रझा अकादमीने राजभवनातील मशीद नमाजासाठी उघडण्याची मागणी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे; मात्र राजभवनामध्ये कोणतीही मशीद नसल्याचे सूत्रांच्या हवाल्याने ‘हिंदुस्थान टाइम्स’च्या वृत्तात म्हटले आहे.

भोंगळ आणि भ्रष्ट कारभाराच्या विरोधात भाजपचा कणकवली उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकार्‍यांना घेराव

आज शासकीय कर्मचार्‍यांना सहस्रो रुपयांपासून लाखो रुपयांपर्यंत वेतन मिळते. असे असतांना वैद्यकीय दाखले आणि शस्त्रक्रिया यांसाठी रुग्णांकडून पैसे घेतले जात असतील, तर ते सर्वथा लज्जास्पद आहे !

शिरोडा येथे फोंडा कीर्तन विद्यालयाचा आज चक्रीकीर्तन कार्यक्रम

गोमंतक संत मंडळ संचालित कीर्तन विद्यालय फोंडा आणि शांताप्रसाद अद्वैतानंद न्यास शिरोडा यांच्या वतीने २२ नोव्हेंबर या दिवशी दुपारी ३ वाजता शांताप्रसाद अद्वैतानंद सभागृह, चिकनगाळ, शिरोडा येथे चक्रीकीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे.

कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर वास्को पोलिसांनी उत्तर भारतियांना छठ पूजा करण्यापासून रोखले

बार चालू, रेस्टॉरंट चालू, कॅसिनो चालू. मग हिंदूंचे सण-उत्सव बंद का ? भाविक हिंदू कोरोनाची मार्गदर्शक तत्त्वे पाळत नाहीत आणि दारूडे पाळतात, असे प्रशासनाला वाटते का ?