पुणे – जिल्ह्यातील नववी ते बारावी पर्यंतचे वर्ग चालू करण्याविषयी सिद्धता करण्यात आली होती; मात्र दिवाळीनंतर शहरात पुन्हा कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. शहरात दाखल झालेल्या केंद्रीय पथकाने दुसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता पुणे शहरातील सर्व शाळा १३ डिसेंबरपर्यंत आणि पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील शाळा नोव्हेंबर अखेरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. ग्रामीण भागातील शाळा २३ नोव्हेंबरपासून चालू करण्यात येणार आहेत.