सातारा, २२ नोव्हेंबर (वार्ता.) – येथील सनातनचा बालसाधक कु. यशराज सुर्यकांत देशमुख हा महाराजा सयाजीराव गायकवाड विद्यालयात इयत्ता ५ वीमध्ये शिकत आहे. फेब्रुवारी मासामध्ये झालेल्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत २८८ पैकी २६२ गुण मिळवून कु. यशराज याने राज्यात १३ वा क्रमांक मिळवला आहे. कु. यशराज याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. यासाठी कु. यशराज याला त्याचे वडील सुर्यकांत देशमुख, आई अस्मिता देशमुख आणि शाळेतील शिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाचे श्रेय कु. यशराज याने सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु (डॉ.) जयंत आठवले आणि सनातनने केलेले संस्कार यांना दिले आहे.