सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयातील साधकांसमवेत श्री क्षेत्र पंढरपूरला श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी आणि आध्यात्मिक संशोधनासाठी गेल्या होत्या. त्या वेळी वारीत चालत असलेल्या काही वारकर्यांचे मनोगत त्यांनी जाणून घेतले.
१. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी वारीमधील एका वृद्ध वारकर्याला विचारले, ‘‘आजोबा, तुम्ही केव्हापासून वारी करत आहात ?’’ त्यावर तो वारकरी म्हणाला, ‘‘मी माझ्या आईच्या पोटात होतो, तेव्हापासूनच मी वारी करत आहे.’’
२. दुसर्या एका वारकर्याला विचारले, ‘‘काका, तुम्ही या उन्हातान्हात किती दिवस असेच चालणार ? सतत उन्हात चालत राहून तुम्ही काळे नाही का होणार ?’’ त्यावर ते वारकरी म्हणाले, ‘‘जोवर आम्ही आमच्या ईट्टलावानी काळं व्हत न्हायी, तोवर असेच चालत र्हानार.’’ म्हणजे ‘जोपर्यंत आम्ही आमच्या विठ्ठलासारखे पूर्ण काळे होत नाही, म्हणजेच त्याच्याशी पूर्णतः एकरूप होत नाही, तोपर्यंत आम्ही देवासाठी असेच चालत रहाणार.’
– श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ