देवाजवळ काय मागावे ?
जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणतात, ‘देवा, मला तुझा कधीही विसर न पडावा, असा वर दे. मी आनंदाने तुझे गुण गाईन. माझी सर्वकाही मिळकत तूच आहेस. हे भगवंता, तुझे रूप सदैव माझ्या नयनी असावे.’
जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणतात, ‘देवा, मला तुझा कधीही विसर न पडावा, असा वर दे. मी आनंदाने तुझे गुण गाईन. माझी सर्वकाही मिळकत तूच आहेस. हे भगवंता, तुझे रूप सदैव माझ्या नयनी असावे.’
स्वतःला भक्त म्हणवणारे काही लोक दिवसातून एक घंटा देवाचे नाव घेतात आणि मग म्हणतात, ‘‘आता २३ घंटे कसेही वागले, तरी प्रत्यवाय (हरकत) नाही.’’ पतीव्रता असे म्हणू शकेल का की, मी केवळ एक घंटा पातिव्रत्य पाळणार आणि मग २३ घंटे कसेही वागणार ?
‘भक्ती ही परम प्रेमस्वरूप असावी’, असे भक्तीचे स्वरूप सांगून नारद सांगतात – भक्ती ‘यथा व्रजगोपिकानाम् ।’ (नारदभक्तिसूत्र, अध्याय २, सूत्र २१), म्हणजे ‘गोकुळातील गोपींच्या भक्तीप्रमाणे असावी.’ व्रजगोपिकांची कृष्णावरील भक्ती ‘अव्यभिचारिणी’ होती…
‘पंढरपूर, श्री विठ्ठल, श्री रुक्मिणी, एकादशी आणि वारी यांची एक विशिष्ट सांगड आहे. या सर्वांत एक समान धागा आहे की, ज्यामुळे एक सुंदर पुष्पमाळ सिद्ध होते. माळेला मणी असतात आणि ते एका सूत्रात गुंफतात. त्याप्रमाणे भक्त आणि भक्ती हा समान धागा सूत्र असून संत हे मेरुमणी आहेत.
इंदूर (मध्यप्रदेश) येथील थोर संत प.पू. भक्तराज महाराज एकदा त्यांच्या भक्तांसह पंढरपूर येथे गेले होते. रात्री १० वाजता प.पू. बाबा पांडुरंगाच्या समोर उभे राहिले.
देवाच्या कृपेने जग पुष्कळ सुंदर आहे आणि मी या सुंदरतेचा आनंद घ्यायला आलो आहे.
एके दिवशी हिरण्यकश्यपूने त्याच्या पुत्राला मांडीवर घेऊन विचारले की, बाळ प्रल्हादा, इतके दिवस तू गुरुजींकडून जे ज्ञान प्राप्त केलेस त्यांपैकी काही चांगल्या गोष्टी मला सांग. तेव्हा प्रल्हाद म्हणाला, ‘‘भगवान विष्णूंच्या भक्तीचे ९ प्रकार आहेत’’, असे म्हणून त्याने नवविधा भक्तीचे प्रकार हिरण्यकश्यपूला सांगितले. श्रवणं कीर्तनं विष्णोः स्मरणं पादसेवनम् । अर्चनं वन्दनं दास्यं सख्यमात्मनिवेदनम् ।। अर्थ : … Read more
संत नामदेव खरोखरच प्राणत्याग करण्यासाठी निघाल्यावर मूर्तीतून पांडुरंग अवतरित झाले. नामदेवाच्या भक्तीपायी देवाला प्रगट व्हावे लागले आणि नैवेद्य ग्रहण करावा लागला.
‘प्रत्येक कृती भावाला जोडून भावपूर्ण केल्यावरच माझ्यातील ‘मी’चे, म्हणजे अहंचे प्रमाण न्यून होऊन माझा भाव वाढणार आहे. त्यामुळे मला ईश्वराचे अस्तित्व जाणवणार आहे’, हे लक्षात घेऊन मी प्रत्येक कृतीला भाव जोडून ती भावपूर्ण करीन.’