श्री तुळजाभवानी मातेच्या अभिषेक शुल्कामध्ये केलेली दरवाढ स्थगित !

मंदिरामध्ये कोणत्याही प्रकारची दरवाढ करतांना पुजारी मंडळींना विश्‍वासात का घेतले जात नाही ? कि मंदिर सरकारीकरणामुळे मंदिर प्रशासन केवळ निधी वाढवण्याच्या मागे लागले आहे ?

बुलंदशहर (उत्तरप्रदेश) येथे मजुरांच्या मुलींच्या विवाह अनुदान योजनेत लक्षावधी रुपयांचा घोटाळा !

सरकारी अनुदान देतांना संबंधित लाभार्थीची पात्रता पडताळूनच ते दिले गेले पाहिजे. हा साधा नियमही न पाळणार्‍या संबंधित भ्रष्ट प्रशासकीय अधिकार्‍यांची चौकशी करून त्यांच्याकडून ही रक्कम वसूल केली पाहिजे !

महापुरुषांनी शिक्षण घेतलेल्या शाळांमध्ये महाराष्ट्र शासन त्यांच्या कार्याचे संग्रहालय उभारणार !

राज्यशासनाचा अभिनंदनीय निर्णय ! विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्राभिमान निर्माण होण्यासाठी राष्ट्रपुरुषांच्या कार्याचा पाठ्यपुस्तकांमध्येही समावेश करावा !

शिवसेना आणि उद्धव ठाकरे गट यांच्या सर्व आमदारांना विधानसभेच्या अध्यक्षांची नोटीस !

दोन्ही पक्षांकडून एकमेकांच्या आमदारांना अपात्र ठरवण्याविषयी अध्यक्षांना पत्र देण्यात आले होते, तसेच सर्वाेच्च न्यायालयातही दोन्ही पक्षांकडून याचिका करण्यात आली होती. विधानसभेच्या अध्यक्षांनी घ्यावा, असे निर्देश न्यायालयाकडून देण्यात आले होते. त्यानुसार ही नोटीस अध्यक्षांनी पाठवली आहे.

मुंबईतील भिकार्‍याचे मासिक उत्पन्न ७५ सहस्र रुपये !

घरची आर्थिक परिस्थिती प्रतिकूल असल्याने शिक्षण घेता आले नाही; म्हणून मुंबईतच वेगवेगळ्या रस्त्यांवर भीक मागणे त्याने चालू केले. या भिकार्‍याचे लग्न झाले असून त्याच्या कुटुंबात भावासह वडील आणि स्वतःची दोन मुलेही आहेत.

हिंदुत्वाच्या अपप्रचाराच्या विरोधातील बौद्धिक लढ्यात सहभागी व्हा !

जगभरात ज्या ज्या देशांत साम्यवाद्यांनी सत्ता बळकावली, ती रक्तरंजित क्रांती करूनच बळकावली आहे. भारतातही नक्षलवादी चळवळीच्या माध्यमातून त्यांनी प्रयत्न करून पाहिला; मात्र त्याला मर्यादा असल्याने त्यांनी आता कूटनीतीचा वापर चालू केला आहे. या आक्रमकांनी आता एकत्र येऊन मानसिक आणि बौद्धिक स्तरावरील युद्धनीतीचा वापर चालू केला आहे…

कोल्हापूर येथील राजाराम बंधार्‍यांवर पाणी आल्याने कसबा बावडा ते वडणगे वाहतूक बंद !

पंचगंगा नदीवरील राजाराम बंधार्‍यावर १ फूट पाणी आल्याने कसबा बावडा ते वडणगे हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

श्री. विनायक देशपांडे यांना वर्ष २०२३ चा ‘सार्वजनिक काका’ पुरस्कार प्रदान !

पुणे – येथील सुपर्ण कार्यालयात संपन्न झालेल्या कार्यक्रमात पुणे सार्वजनिक सभेच्या वतीने वर्ष २०२३ चा ‘सार्वजनिक काका’ पुरस्कार श्री. विनायक काशिनाथराव देशपांडे यांना प्रदान करण्यात आला.

नगरमधील बडीसाजन मंगल कार्यालयात १८ ते २७ जुलै या कालावधीत श्रीरामकथा ज्ञानयज्ञ सोहळा !

नगर येथील बडीसाजन ओसवाल श्री संघ कार्यालयात १८ ते २७ जुलै २०२३ या कालावधीत श्रीरामकथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याचा शुभारंभ शोभायात्रेने करण्यात येणार असून त्याची जय्यत सिद्धता करण्यात आली आहे.

श्री तुळजाभवानीमातेच्या अभिषेक पूजेचे शुल्क ५० वरून ५०० रुपये !

मंदिर सरकारीकरणाचा हा दुष्परिणाम होय. मंदिरांच्या संदर्भात योग्य निर्णय होण्यासाठी मंदिरे भक्तांच्या कह्यातच हवीत !