‘बंटी माठेकर मित्रमंडळा’चा पुढाकार !
सावंतवाडी : उन्हाळा झाला आहे. वन्य प्राणी पाण्याच्या शोधामध्ये भर वस्तीमध्ये येत असल्याने लोकांच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो. याविषयी ‘बंटी माठेकर मित्रमंडळा’च्या माध्यमातून वन विभागाला वारंवार कल्पना देऊनही वन विभागाने याची अद्याप नोंद घेतलेली नाही. त्यामुळे अखेर वन्य प्राण्यांना पाणी मिळावे, याकरता मदारी रोड, सासोलकर मैदानाच्या जवळ या मित्रमंडळाने पाण्याचे कृत्रिम तळे सिद्ध केले आहे.
अशाप्रकारे वन विभागानेही ठिकठिकाणी कृत्रिम पाण्याची तळी सिद्ध करून वन्य प्राण्यांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, तसेच ‘भर वस्तीमध्ये वन्यप्राणी येऊ नयेत’, यासाठी वन विभागाने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ‘बंटी माठेकर मित्रमंडळा’ने केली आहे.
मदारी रोड येथे तळे बांधण्यासाठी अमित सावंत, संजय नाईक, सचिन सासोलकर, बाळा सोनकर, बंटी माठेकर, प्रसाद जोशी यांनी यासाठी पुढाकार घेतला.
संपादकीय भूमिका
|