‘नागरिकत्व सुधारणा कायद्या’मुळे ‘निधर्मी’ आणि तथाकथित पुरोगामी यांचा खरा चेहरा उघडा पडला !

वर्ष १९४७ मध्ये पाकिस्तानातील हिंदूंची लोकसंख्या २१ टक्के इतकी होती. आज ती २ टक्के इतकीच आहे. बांगलादेश आणि अफगाणिस्तान येथेही हीच अवस्था आहे. कुठे गेले हे सगळे लोक ? पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान येथील धार्मिक छळामुळे फसलेल्या हिंदु, बौद्ध, जैन, शीख आणि पारशी यांनी कुठे जायचे ? त्यांना सन्मानाने जगण्याची संधी देणे, हे फक्त आणि फक्त भारताचे कर्तव्य आहे. ते पूर्ण करण्यासाठी ‘नागरिकत्व सुधारणा कायदा’ (सीएए) लागू केल्याविषयी मोदी सरकारचे मनःपूर्वक अभिनंदन आणि धन्यवाद !

श्री. अभिजित जोग

सत्तातूर काँग्रेसने घाईघाईने लागू केलेल्या फाळणीची अपुरी राहिलेली प्रक्रिया आज पूर्ण झाली. आपल्या दुर्दैवी बांधवांना न्याय मिळवून देण्याची व्यवस्था आज आपल्या देशाने शेवटी कार्यवाहीत आणली. या निर्णयाला विरोध करणार्‍या, स्वतःला ‘निधर्मी’ (सेक्युलर) आणि मानवतावादी म्हणवून घेणार्‍या तथाकथित पुरोगाम्यांचा विकृत, द्वेषपूर्ण चेहरा आता पूर्णपणे उघडा पडला आहे.

– श्री. अभिजित जोग, ‘असत्यमेव जयते’ आणि ‘जगाला पोखरणारी डावी वाळवी’ या पुस्तकांचे लेखक

(श्री. अभिजित जोग यांच्या फेसबुकवरून साभार)