सिक्कीममध्ये ढगफुटी : तिस्ता नदीला आलेल्या पुरामुळे हाहा:कार !

सिक्कीममध्ये ४ ऑक्टोबरच्या रात्री दीड वाजता अचानक आलेल्या पुरामुळे हाहा:कार माजला. उत्तर सिक्किममधील ल्होनाक तलावाच्या वर ढगफुटी झाल्याने लाचेन खोर्‍यातील तिस्ता नदीची पाणी पातळी तब्बल १५-२० फुटांनी वाढली. या पुरामुळे भारतीय सैन्याचे २३ सैनिक बेपत्ता झाले.

खटले रखडत असल्याने आरोपींना वर्षानुवर्षे कारागृहात रहावे लागते ! – न्यायमूर्ती भारती डांगरे

खटले इतके का रखडतात ? यामागील कारणांचा अभ्यास करून न्याययंत्रणेने लवकरात लवकर न्यायदान करण्याचा प्रयत्न करावा, तसेच सरकारनेही या समस्येचे निराकरण करण्यासाठी लक्ष घालावे, अशीच जनतेची अपेक्षा आहे !

छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात २४ घंट्यांत १८ रुग्णांचा मृत्यू !

छत्रपती संभाजीनगर – येथील शासकीय घाटी रुग्णालयात २४ घंट्यांत १८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये २ बालकांचा समावेश आहे. घाटी रुग्णालयात ज्या रुग्णांचा मृत्यू झाला, त्यांना इतर रुग्णालयांतून गंभीर अवस्थेत असतांना भरती करण्यात आले आहे.

गणेशोत्‍सवात ‘डीजे’ला फाटा देत वृद्धाश्रमास ५० सहस्र रुपयांचे साहाय्‍य !

रेस्‍ट कँप रस्‍त्‍यावरील ‘बनात चाळ मित्रमंडळा’ने यंदा गणेशोत्‍सवात डीजे वा बँजो (तंतुवाद्य), मिरवणूक व्‍ययाला फाटा देत या रकमेतून पाथर्डी फाटा येथील ‘मानवसेवा केअर सेंटर’च्‍या वृद्धाश्रमाला ५० सहस्र रुपयांचे किराणा साहित्‍य भेट देत माणुसकी जोपासली.

शंकराचार्य विजयेंद्र सरस्वती राममंदिर आंदोलनात मारल्या गेलेल्या कारसेवकांसाठी करणार श्राद्ध !

आता यावरून धर्मनिरपेक्षतावादी म्हणजेच नतद्रष्ट हिंदूंकडून विरोध झाल्यास आश्‍चर्य वाटू नये ! धर्मनिरपेक्षतावादी आणि पुरो(अधो)गामी एका बाजूला श्राद्धाला थोतांड म्हणतात, पण काहीही करून हिंदुत्वनिष्ठांना विरोध करण्यासाठी ते शंकराचार्यांनाही जाब विचारण्यास कमी करणार नाहीत, हेही तितकेच खरे !

गुन्हेगारी पार्श्‍वभूमीच्या व्यक्तीला उमेदवारी दिल्यास राजकीय पक्षांना वर्तमानपत्रांतून कारण द्यागे लागणार !

यापेक्षा अशा व्यक्तींना निवडणूकच लढवता येणार नाही, असा नियम बनवणे आवश्यक आहे !

सार्वजनिक उत्सवांना येणारे बीभत्स स्वरूप वेळीच थांबवले पाहिजे ! – राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे

गणपति असो, दहीहंडी असो, नवरात्रोत्सव, रामजन्माचा उत्सव असो की हिदूंच्या अन्य देवतांचे उत्सव असोत, ते या देशात उत्साहाने साजरे व्हायलाच पाहिजेत; परंतु सार्वजनिक उत्सवांना येणारे बीभत्स स्वरूप वेळीच थांबवले पाहिजे, अशी भावना मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘ट्वीट’ करून व्यक्त केली आहे.

पुरी येथील भगवान जगन्नाथ मंदिराची देशभरात ६० सहस्र ८२२ एकरहून अधिक भूमी ! – जगन्नाथ सराका, कायदामंत्री, ओडिशा

पुरी येथील भगवान जगन्नाथ मंदिराची ओडिशा आणि अन्य ६ राज्ये येथे ६० सहस्र ८२२ एकरहून अधिक भूमी आहे, अशी माहिती ओडिशाचे कायदामंत्री जगन्नाथ सराका यांनी विधानसभेत एका प्रश्‍नाच्या उत्तरात दिली.

एका कार्यक्रमासाठी कर्णकर्कश ध्‍वनीक्षेपक लावल्‍याप्रकरणी महापालिकेवर गुन्‍हा नोंद का झाला नाही ? – मनसे

गणेशोत्‍सवाच्‍या काळात डीजे वाजवण्‍यास बंदी असूनही अनेक जण कर्णकर्कश आवाजात ध्‍वनीक्षेपक आणि डीजे वाजवत आहेत. यामुळे शहरातील २२ गणेशोत्‍सव मंडळांवर पोलिसांनी गुन्‍हे नोंद केले आहेत.

नागपूर येथे ७ सहस्र १७७ श्री गणेशमूर्तींचे विसर्जन !

श्री गणेशमूर्ती शाडूच्‍या मातीची करून शास्‍त्रसुसंगत गणेशोत्‍सव साजरा करणार्‍या नागपूरकरांचे अभिनंदन !