मुंबई – हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकार जातात तेथे प्रसारमाध्यमे आपोआप पोचतात. पार्ट्या, मोठ्या उद्योगपतींकडील विवाह आदी ठिकाणी हे लोकप्रिय कलाकार दिसतात. यासह कुणाचा मृत्यू झाला असेल, तर त्यांच्या अंत्यसंस्कार किंवा प्रार्थना सभा यांनाही हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकार उपस्थित रहातात. अत्यसंस्काराला, तसेच तेराव्याच्या दिवशी जाण्यासाठीही हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकार पैसे घेतात, असे वक्तव्य अभिनेता अनुज साहनी यांनी ‘बिग स्मॉल टॉक नाऊ’ या कार्यक्रमात केले.
संपादकीय भूमिकाहे सत्य असेल, तर हिंदी चित्रपटसृष्टीने किती खालची पातळी गाठली आहे, हे दिसून येते ! |