लालबागचा राजाच्‍या मंडपात भाविक आणि पदाधिकारी यांमध्‍ये हाणामारी !

शहरातील लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्‍सव मंडळाच्‍या मंडपात पदाधिकारी आणि भाविक यांमध्‍ये हाणामारी झाल्‍याची दुर्दैवी घटना घडली.

कर्नाटकमधील सरकारी शाळेत विद्यार्थिनीने श्री गणेशाची पूजा केल्याने शिक्षिकेकडून मारहाण !

कर्नाटकात काँग्रेसचे सरकार आल्यापासून हिंदूंवर सातत्याने अत्याचार केले जात आहेत. काँग्रेसला सत्तेवर बसवणार्‍या हिंदूंना हे मान्य आहे का ?

भारतीय वैद्यकीय विद्यार्थ्यांना आता परदेशात करता येणार रुग्णांवर उपचार !

जागतिक वैद्यकीय शिक्षण महासंघाने भारताच्या ‘नॅशनल मेडिकल कमिशन’ला १० वर्षांसाठी मान्यता दिली आहे. यामध्ये भारतातील ७०६ वैद्यकीय महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांचाही समावेश आहे.

गुजरात उच्च न्यायालयाने एका सुनावणीच्या वेळी दिला स्कंद पुराणाचा संदर्भ !

गुजरात उच्च न्यायालयाने एका प्रकरणाची सुनावणी करतांना स्कंद पुराणाचा संदर्भ दिला. अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्यानंतर ती गरोदर राहिल्याने तिने गर्भपात करावी, असे तिच्या आई-वडिलांची इच्छा होती.

नाशिक जिल्‍ह्यात कांदा लिलाव बंद, सर्व १७ बाजार समित्‍यांना टाळे !

कांदा व्‍यापार्‍यांनी विविध मागण्‍यांसाठी लासलगावसह नाशिक जिल्‍ह्यातील १७ बाजार समित्‍यांमधील लिलावात २० सप्‍टेंबरपासून सहभागी न होण्‍याचा निर्णय घेतला आहे. लिलाव बंदमुळे शेतकर्‍यांची कोंडी झाली असून अंदाजे ३० ते ४० कोटी रुपयांची उलाढाल थंडावली आहे.

पनवेलमधील लेडीज बारवर धाड

पनवेल तालुका पोलिसांनी स्‍वतःच्‍या हद्दीतील २ लेडीज बारवर नुकतीच धाड टाकून ३४ महिला, तसेच २३ अन्‍य लोक, तसेच व्‍यवस्‍थापक, नोकर आणि ग्राहक अशा ५७ व्‍यक्‍तींना कह्यात घेतले.

मुंबईत लोकलमध्ये अश्‍लील नृत्‍य करणार्‍या तरुणीच्‍या व्‍हिडिओवर मुंबईकर संतापले

लोकलमध्ये एका तरुणीचा ‘बेली डान्‍स’ नावाचा अश्‍लील नृत्‍यप्रकार करतांनाचा व्‍हिडिओ प्रसारित होत आहे. प्रसिद्धी मिळवण्‍यासाठी तरुण-तरुणी अशा प्रकारच्‍या गोष्‍टी हल्ली मोठ्या प्रमाणात करतात; परंतु या व्‍हिडिओवर मुंबईकरांनी जोरदार संतप्‍त प्रतिक्रिया दिल्‍या आहेत.

लेस्टर (ब्रिटन) येथे श्री गणेशचतुर्थीच्या दिवशी अहमद नावाच्या पोलिसाकडून हिंदु पुजार्‍याशी अयोग्य वर्तन !

लेस्टरमध्येच धर्मांध मुसलमानांनी काही मासांपूर्वी हिंदूंवर आक्रमण केले होते आणि पोलीस मूकदर्शक राहिले होते ! या पोलिसांमध्ये सर्वच ‘अहमद’ भरले आहेत, असेच आता या घटनेनंतर वाटू लागले आहे !

भारताने कॅनडाच्या नागरिकांसाठी व्हिसा सेवा थांबवली !

कॅनडात झालेल्या खलिस्तानी आतंकवादी हरदीप सिंह निज्जर याच्या हत्येवरून कॅनडा आणि भारत यांच्यात चालू झालेल्या वादातून आता भारताने कॅनडाच्या नागरिकांना व्हिसा देण्याचे तात्पुरते थांबवण्यात आल्याची घोषणा केली आहे.

खलिस्तानचे समर्थन करणारा गायक शुभनीत सिंह याच्या कार्यक्रमाचे प्रायोजकत्व ‘बोट’ आस्थापनाने काढले !

बोट आस्थापनाचे अभिनंदन ! खलिस्तान्यांवर आता देशभरातून बहिष्कार घालण्यास प्रारंभ झाल्यावर ते ताळ्यावर येतील !