राष्ट्रध्वजाचा अवमान टाळण्यासाठी मुंबईतील उपनगरांमध्ये जनजागृती !

मुंबई – महाराष्ट्रदिनाच्या दिवशी रस्त्यावर किंवा इतरत्र राष्ट्रध्वज पडलेले आढळून आल्यास संबंधित तहसील कार्यालयात किंवा जिल्हा स्तरावरील यंत्रणेकडे सुपुर्द करावेत, असे आवाहन मुंबई उपनगर जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांनी केले आहे.

प्लास्टिक आणि कागदी राष्ट्रध्वजांचा वापर थांबवण्याविषयी जनजागृती करण्याकरता मुंबई उपनगरामध्ये जिल्हास्तरावर, तसेच अंधेरी, बोरीवली आणि मुलुंड या ठिकाणी समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून जनजागृतीही करण्यात येत आहे.

संपादकीय भूमिका 

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती गेली २३ वर्षे राष्ट्रध्वजाचा अवमान टाळण्यासाठी शासनाला वारंवार निवेदने देणे, जनजागृती करणे अशी मोहीम राबवत आहे ! आता त्याची शासकीय स्तरावर नोंद घेऊन कृती होऊ लागणे, हे त्याचेच फलित आहे !