गुरुद्वारावरील आक्रमणाच्या प्रकरणी शिखांकडून चौकशीची मागणी !

उत्तर कॅरोलिना येथील एकाच गुरुद्वारावर वारंवार होणार्‍या आक्रमणांमुळे शीख समुदायात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे या आक्रमणांची सखोल चौकशी करण्याची मागणी शिखांनी केली आहे.

खलिस्तानवाद्यांचा बीमोड !

इस्लाममधील त्रुटी वैचारिक स्तरावर पुढे आल्यावर आज जगभरातून त्याला विरोध होत आहे. ज्याप्रमाणेच खलिस्तानवादी चळवळ मुत्सद्देगिरीने कडक धोरण अवलंबून मोडून काढली पाहिजे, त्याचसमवेत येथील शिखांमध्येही वैचारिक प्रबोधन केले पाहिजे !

देहलीमध्ये शिखांच्या धार्मिक संस्थेकडून चालवण्यात येणार्‍या शाळेत श्री सरस्वतीदेवीची पूजा केल्याने शिक्षिका निलंबित !

शिखांचा पैसा त्यांच्यासाठीच खर्च झाला पाहिजे ! – कमेटीचे माजी अध्यक्ष हरविंदरसिंह सरना

इंदूर (मध्यप्रदेश) येथील सिंधी मंदिरांतील ‘श्री गुरुग्रंथ साहिब’च्या प्रती गुरुद्वारामध्ये जमा !

निहंग शिखांनी मंदिरांत देवतांच्या मूर्तींसमवेत ‘श्री गुरुग्रंथ साहिब’ ठेवण्यावर घेतला होता आक्षेप !

‘लष्कर-ए-खालसा’ या खलिस्तानी आतंकवादी संघटनेकडून भाजपच्या नेत्यांना पक्ष सोडण्यासाठी धमक्या !

जिहादी आतंकवादासमवेत आता खलिस्तानी आतंकवाद वाढू लागला आहे. याकडे सरकारने अधिक गांभीर्याने पहात त्याची पाळेमुळे घट्ट होण्यापूर्वीच ती उखडून टाकणे आवश्यक आहे !

बिजनौर (उत्तरप्रदेश) येथे शीख तरुणावर ख्रिस्ती धर्म स्वीकारण्यास दबाव

पगडी काढून केस कापले !
४ जणांना अटक

आज ‘वीर बालक दिवसा’निमित्तच्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी सहभागी होणार !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिखांचे १० वे गुरु श्री गुरु गोविंद सिंह यांच्या ‘प्रकाश पर्व’ दिनानिमित्त त्यांचे पुत्र बाबा जोरावर सिंह आणि बाबा फतेह सिंह यांच्या हौतात्म्यावरून आजचा दिवस ‘वीर बाल दिवस’ म्हणून साजरा करण्याचे घोषित केले होते.

अमेरिकेच्या ‘मरीन’ सैन्यामध्ये भरती होणार्‍या शिखांना दाढी ठेवण्याची आणि पगडी घालण्याची अनुमती

अमेरिकेच्या ‘मरीन’ (नौदलाप्रमाणे कार्य करणारे) सैन्यात  भरती होणार्‍या शिखांना दाढी ठेवण्याची आणि पगडी घालण्याची अनुमती येथील एका न्यायालयाने दिली आहे.

ऑस्ट्रेलियामध्ये खलिस्तानवाद्यांकडून हिंदु ब्राह्मणांनी शिखांना जाळल्याचा दुष्प्रचार !

जिहादी आतंकवाद्यांनतर आता खलिस्तानी आतंकवादीही हिंदूंना लक्ष्य करत आहेत. हे लक्षात घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यासाठी भारत सरकार काय पावले उचलणार ?

पंजाबमध्ये पोलीस ठाण्यावर रॉकेट लाँचरद्वारे आक्रमण

पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचे सरकार आल्यापासून खलिस्तानी आतंकवाद्यांच्या कारवायांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. हे पहाता केंद्र सरकारने आताच कठोर पावले उचलण्याची आवश्यकता आहे !