अमेरिकेच्या ‘मरीन’ सैन्यामध्ये भरती होणार्‍या शिखांना दाढी ठेवण्याची आणि पगडी घालण्याची अनुमती

प्रतिकात्मक छायाचित्र

वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेच्या ‘मरीन’ (नौदलाप्रमाणे कार्य करणारे) सैन्यात  भरती होणार्‍या शिखांना दाढी ठेवण्याची आणि पगडी घालण्याची अनुमती येथील एका न्यायालयाने दिली आहे. धार्मिक आधारावर अशा प्रकारची अनुमती देणे संघटितपणाला दुर्बल करू शकते, असा घेण्यात आलेला आक्षेप न्यायालयाने या वेळी फेटाळून लावला.

अमेरिकेचे पायदळ, नौदल आणि वायूदल यांच्यासह तटरक्षक दलात यापूर्वीत शिखांना दाढी ठेवण्याची आणि पगडी घालण्याची अनुमती देण्यात आली आहे.