गुरुद्वारावरील आक्रमणाच्या प्रकरणी शिखांकडून चौकशीची मागणी !

अमेरिकेतील उत्तर कॅरोलिना येथील एकाच गुरुद्वारावर वारंवार होणार्‍या आक्रमणाचे प्रकरण

उत्तर कॅरोलिना (अमेरिका) – येथील एकाच गुरुद्वारावर वारंवार होणार्‍या आक्रमणांमुळे शीख समुदायात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे या आक्रमणांची सखोल चौकशी करण्याची मागणी शिखांनी केली आहे.

अजय सिंह नावाच्या एका शीख व्यक्तीने ‘द शार्लोट ऑब्जर्वर’ या स्थानिक वर्तमानपत्राला सांगितले की, गेल्या वर्षी येथील गुरुद्वारा साहिब खालसा दरबार परिसराच्या आसपास कचरा टाकला होता. त्यानंतर झालेल्या आक्रमणात सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची तोडफोड करण्यात आली होती. त्यानंतर ३ जानेवारी २०२३ या दिवशी याच गुरुद्वारातील पूजाघराजवळील एका खिडकीची तोडफोड करण्यात आली. पुढे दोनच दिवसांनंतर पुन्हा अन्य येथीलच अन्य एका खिडकीची तोडफोड करण्यात आली. या प्रकरणी वेळोवेळी पोलिसांत तक्रार करण्यात आली आहे.