ज्ञानेश्वरीशी संबंधित २ पुस्तकांचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते प्रकाशन !

ज्ञानेश्वरीशी संबंधित २ पुस्तकांचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते प्रकाशन

आळंदी (जिल्हा पुणे) – शालेय विद्यार्थ्यांसाठी मूल्य संवर्धनाच्या दृष्टीने श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमेटी आणि ओळख श्री ज्ञानेश्वरी परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने २ महत्त्वपूर्ण पुस्तकांचा प्रकाशन सोहळा पार पडला. या प्रकाशन सोहळ्यात ‘ज्ञानेश्वरीची ओळख’, तसेच ‘परिचय भागवत धर्माचा ओळख ज्ञानेश्वरीची’ या २ पुस्तकांचे प्रकाशन उद्योग आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते २ मार्च या दिवशी माऊली मंदिरात करण्यात आले. ‘शालेय विद्यार्थ्यांना श्री ज्ञानेश्वरीचे आणि भागवत धर्माचे महत्त्व शिकवण्यासाठी या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांसाठी हे पुस्तक आदर्श मूल्ये, धर्म आणि संस्कृती समजून घेण्यासाठी मार्गदर्शक ठरेल’, अशी माहिती ओळख श्री ज्ञानेश्वरी परिवाराच्या वतीने श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समितीचे अध्यक्ष प्रकाश काळे यांनी दिली. या वेळी श्री ज्ञानेश्वरी महाराज संस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजन नाथसाहेब, अधिवक्ता राजेंद्र उमाप, पालखी सोहळा प्रमुख ह.भ.प. शांतीब्रह्म मारुति बाबा कुरेकर महाराज, आळंदी देवस्थानचे माजी विश्वस्त डॉ. अभय टिळक यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.