
आळंदी (पुणे) – संत ज्ञानेश्वर महाराजांचा ७२८ वा समाधी सोहळा नुकताच मोठ्या उत्साही वातावरणात साजरा झाला. कार्तिकी यात्रेमध्ये लाखो भाविकांनी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीचे दर्शन घेतले. त्यानिमित्ताने शिणवटा काढण्यासाठी कार्तिकी यात्रेनंतर प्रक्षाळपूजा करण्याची परंपरा आहे. माऊलींच्या समाधीवर गरम पाणी, तसेच दह्यादुधाने स्नान घालण्यात आले आणि आयुर्वेदाचा काढाही देण्यात आला. ८ डिसेंबरला सकाळी ११ वाजेपर्यंत दर्शनाला येणारे भाविक लिंबू आणि साखर समाधीला चोळून दर्शन घेत होते. योग्य नियोजन केल्याने अधिकाधिक भाविक आणि आळंदीकर ग्रामस्थ यांनी प्रक्षाळपूजेचा लाभ घेतला असल्याचे मंदिर समितीचे व्यवस्थापक श्री. ज्ञानेश्वर वीर यांनी सांगितले आहे.
‘एस्.एन्.डी.टी. महिला विद्यापिठा’च्या कारभाराची चौकशी होणार !
वाशी येथे २५ जुलै या दिवशी ‘कारगिल विजय दिवसा’चे आयोजन !
बांधकाम व्यावसायिकास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी १४ जणांवर गुन्हा नोंद
पुणे येथील जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पावन तपोभूमीचे अस्तित्व अवैध उत्खननामुळे धोक्यात !
पतीला सोडून देण्यासाठी प्रेयसीने पत्नीकडे केली १२ लाखांची मागणी !
FIR Against Kunal Kamra : विनोदी कलाकार कुणाल कामरा याच्याविरुद्ध हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी तक्रार !