संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचे लोणंद येथे आज नीरा नदीत स्नान होणार !
वारीच्या मार्गांमध्ये संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांना ३ वेळा स्नान घालण्यात येते. प्रथम आळंदीतून प्रस्थान होण्याआधी इंद्रायणी नदीमध्ये, दुसरे निरा नदीमध्ये, तर तिसरे स्नान पंढरपूरला पोचल्यानंतर चंद्रभागा नदीमध्ये घातले जाते.