‘एकदा संगीताविषयी विचार करतांना सुरांच्या अक्षरांतून ध्वनित होणारे अर्थ देवाने काव्य रूपाने सुचवले. ते काव्य येथे देत आहे. सच्चिदानंद परब्रह्म गुरुमाऊली, हे केवळ तुमच्या कृपेने सुचले, ते तुमच्या चरणी अर्पण करते.

आरोह आणि अवरोह
१. आरोह : स्वर क्रमाक्रमाने चढवत जाण्याच्या क्रियेला ‘आरोह’ असे म्हणतात, उदा. सा रे ग म प ध नी सा
२. अवरोह : स्वर क्रमाक्रमाने उतरवत येण्याच्या क्रियेला ‘अवरोह’ असे म्हणतात, उदा. सा नी ध प म ग रे सा
सुरांविषयी सुचलेले काव्य
बासुरीच्या सुरांतूनी सार्या जगा मोहवी श्रीकृष्ण ।
रे : ‘रे’ म्हणतांना कारुण्य भावे हाक मारावी ।
ग : ‘ग’ उच्चारिता नाद तरंग ब्रह्मांंडी ऐकू यावा ।
म : ‘म’ म्हणता हर्षोल्हासित होऊन स्वर जुळावा मनाशी ।
प : ‘प’ म्हणता मोरपिसातून स्वर जुळावा स्वराशी ।
ध : ‘ध’ धराया जाता सूर तो अंतर्मनी रुजावा ।
नि : निःशब्द करी सूर, द्वैत जाई निघून ।
सा रे जावे विरून त्या बासुरीच्या सुरात ।
सारे जरी विरून गेले ।
श्रीकृष्णा, अस्तित्व तुझे अनुभवले ॥
(शास्त्रीय संगीतात कुठल्याही रागात आरोह आणि अवरोह असतो. वरील स्वर आरोही चलनाप्रमाणे आहे.)
नि : निःशब्द जरी झाले सूर, तरी अद्वैत प्रकाशरूपी झाले ।
ध : धरून सूर, मन आनंदी झाले ।
प : मोर पिसार्यात मन डोलून गेले ।
म : श्रीकृष्ण म्हणे, मना कसे सुरांतून अनुभवले ?
ग : गर्व करू नको, मना शिकविले ।
रे : रे मना, घे अहर्निश माझे नांव ।
सा : सार्या जिवा देईन मी चरणी माझ्या ठाव ॥
(शास्त्रीय संगीतात कुठल्याही रागात आरोह आणि अवरोह असतो. वरील स्वर अवरोही चलनाप्रमाणे आहे.)
– श्रीमती अंजली कुलकर्णी, (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के,वय ७५ वर्षे), फोंडा, गोवा.
![]() ‘भाव तिथे देव’ या उक्तीप्रमाणे संगीतालाही भावाच्या स्थितीतून पाहिल्यावर संगीतातील सप्तसूरही आपल्याला साधनेसाठी कशी दिशा देऊ शकतात ?’, हे श्रीमती अंजली कुलकर्णी यांनी आरोही आणि अवरोही केलेल्या सप्तसुरांच्या माध्यमातून आपल्याला शिकता येते.’ – सुश्री (कु.) तेजल पात्रीकर (आध्यात्मिक पातळी६० टक्के, वय ४७ वर्षे), संगीत विशारद, संगीत समन्वयक, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (१२.१.२०२५) |