‘संगीत हीच प्रकृती आहे आणि प्रकृती (पार्वती) हेच संगीत आहे. संगीत हा आनंद आहे अणि तोच आनंद प्रकृतीत आहे. ज्याप्रमाणे संगीत हे अथांग सागरासारखे आणि व्यापक आहे, त्याप्रमाणेच प्रकृतीलाही सीमा नाही.

ती शक्तीस्वरूपा, ती नादरूपिणी ।
ती आदिमाया, तीच परमजननी ।। १ ।।
प्रकृतीच्या (पार्वतीच्या) नृत्यातूनी ।
तांडव-लास्य सप्तसूरांतूनी गाजे ।। २ ।।
ती नादब्रह्मा शिवाची शक्ती ।
जिवाच्या अंतरातून गंगासम वाहे ।। ३ ।।
नृत्यातील मुद्रा करतांना, होई शक्तीचा आविष्कार ।
जणू प्रकृतीने केला एक अद्भुत चमत्कार ।। ४ ।।
नृत्य करी ती जेव्हा दिव्य रूप प्रकट होई ।
ताल धरी ती जेव्हा संपूर्ण विश्व साहाय्य करी ।। ५ ।।
संगीतात जिच्या सृजनशक्ती वसे ।
स्वरातून जिच्या जिवाची निर्मिती होत असे ।। ६ ।।
स्त्रीचे संगीत सोपे नव्हे ।
हे तर खरे जिवाला परमात्म्याशी जोडणे ।। ७ ।।
प्रत्येक कलेतून व्यक्त होतांना ।
ती प्रत्येक नादाशी एकरूप होतसे ।। ८ ।।
व्यक्त होणे, व्यक्त होणे, हे नेमके काय असते ।
तेथेच भगवंताचे चरण असते ।। ९ ।।
संगीत आणि स्त्री (प्रकृती) हे दोन घटक नव्हे ।
ती असे एक आध्यात्मिक गुंफण ।। १० ।।
केवळ कानांना सुखद वाटणारे गाणे नव्हे ।
ते तर चिरंतन सूर आहेत…ते तर चिरंतन सूर आहेत’ ।। ११ ।।
– कु. म्रिणालिनी देवघरे, भरतनाट्यम् विशारद, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (९.३.२०२५)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |