युवकांनो, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चैतन्यदायी ग्रंथकार्याची पताका फडकत ठेवण्यासाठी ग्रंथनिर्मितीच्या सेवेत सहभागी व्हा !

ग्रंथसेवा ही श्रेष्ठ अशा ज्ञानशक्तीच्या स्तराची सेवा असल्याने शीघ्र आध्यात्मिक उन्नती करून देणारीही आहे. यासाठी युवकांनो, आपली आवड आणि क्षमता यांनुसार ग्रंथनिर्मितीच्या सेवेत सहभागी होऊन या सुवर्णसंधीचा लाभ करून घ्या !

हिंदु राष्ट्र-स्थापनेकरता ‘आपत्काळापूर्वी ग्रंथांच्या माध्यमातून अधिकाधिक धर्मप्रसार व्हावा’, यासाठी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा संकल्प कार्यरत झाल्याने या कार्यात तळमळीने सहभागी होणार्‍यांवर त्यांची अपार कृपा होणार असणे

साधकांनी ग्रंथकार्य गतीने होण्यासाठी तळमळीने प्रयत्न केले, तर संकल्पाचे फळ साधकांना मिळणार आहे, म्हणजेच साधकांची आध्यात्मिक उन्नती गतीने होणार आहे.

आचरणातून आणि सूक्ष्मातून शिकवणे (शिकवणीचे साधकांना झालेले लाभही अंतर्भूत !)

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांची अनमोल शिकवण (खंड २)

हिंदु राष्ट्र-स्थापनेकरता ‘आपत्काळापूर्वी ग्रंथांच्या माध्यमातून अधिकाधिक धर्मप्रसार व्हावा’, यासाठी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा संकल्प कार्यरत झाल्याने या कार्यात तळमळीने सहभागी होणार्‍यांवर त्यांची अपार कृपा होणार असणे

ग्रंथसेवेच्या अंतर्गत संकलन, भाषांतर, संरचना, मुखपृष्ठ-निर्मिती, मुद्रण इत्यादी विविध सेवांमध्ये सहभागी होऊ इच्छिणार्‍यांनी स्वत:ची माहिती सनातनच्या जिल्हासेवकांच्या माध्यमातून पाठवावी.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी सनातनचे ११ वे (समष्टी) संत पू. संदीप आळशी यांच्याबद्दल काढलेले गौरवोद्गार !

प.पू. डॉक्टर म्हणाले, ‘‘संदीप साधकांसाठी किती करतो ना ! एरव्ही साधक सत्संगसेवकाला आढावा देतात आणि त्यानंतर सत्संगसेवक आढावा घेतो; मात्र संदीप स्वतःहून तुमचा आढावा घेतो.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या स्थुलातील अस्तित्वाचे अनन्यसाधारण महत्त्व !

सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांचे सध्याचे कार्य ३० टक्के स्थुलातील, तर ७० टक्के सूक्ष्मातील आहे. यावरून त्यांच्या स्थुलातील अस्तित्वामुळे सूक्ष्मातील केवढे मोठे कार्य होत असेल, याची कल्पना येते.

साधकांनी गुरूंकडे कोणत्या दृष्टीने पहावे ?

गुरूंविषयी विकल्प आल्यास साधकांची साधनेत मोठी हानी होते. असे होऊ नये, यासाठी साधकांनी शक्य असल्यास गुरूंना किंवा त्यांना विचारणे शक्य नसल्यास उन्नत साधकांना स्वत:च्या मनातील शंका मोकळेपणाने अन् शिकण्याच्या स्थितीत राहून विचारावी.

‘संयम ठेवून यशाची वाट पहाणे’ ही तपश्चर्याच आहे !

‘काही साधक काही वर्षे साधना करत असूनही अपेक्षित अशा आध्यात्मिक प्रगतीच्या स्वरूपात यशाची प्राप्ती होतांना त्यांना दिसत नाही. त्यामुळे काही वेळा ते निराश होतात किंवा ‘आता माझ्या साधनेने माझी प्रगती होऊ शकते’ असा त्यांचा आत्मविश्वासच न्यून व्हायला लागतो…..

खरे अध्‍यात्‍म !

साधना वाढली की, पुढे पुढे ‘देवच माझ्‍यातून सर्व करत आहे’, अशी अनुभूती येते. ‘देवाची अनुभूती घेणे, म्‍हणजेच देवाला अनुभवणे’, हेच खरे अध्‍यात्‍म आहे !’