पू. संदीप आळशी यांची साधनेसंदर्भातील मौलिक सूत्रे

पू. संदीप आळशी

१. साधना म्हणून मनाविरुद्ध काही गोष्टी करतांना मनाचा संघर्ष होतो. हा संघर्ष म्हणजेच खरी साधना !

२. मनाला भावपूर्ण प्रार्थनेची आणि शरणागती व्यक्त करण्याची सवय लावायला हवी.

३. शरणागती हा साधकांसाठी प्राणवायू आहे. आध्यात्मिक त्रास होत असतांना शरण गेल्याविना आपण काहीच करू शकत नाही. शरण गेल्यामुळेच सेवा करता येऊ शकते.

४. सेवा करतांना साधकांची ईश्वरप्राप्तीकडे वाटचाल व्हायला हवी ! अनुभूती येणे आणि आध्यात्मिक पातळी वाढणे, हे त्याचे टप्पे आहेत.

५. एखादी जमणारी सेवा कुणी सहजपणे करेल; मात्र जी सेवा जमत नाही, ती करण्याचा प्रयत्न करावा आणि त्यातून पुढचे पुढचे शिकावे. तसे शिकत गेलो की, आनंद मिळतो.

आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.