१. ‘अभिनेता जेव्हा त्याच्या भूमिकेशी एकरूप होतो, तेव्हाच त्याचा अभिनय जिवंत वाटतो. याप्रमाणे साधक जेव्हा मनाने सेवेशी एकरूप होतो, तेव्हाच त्याची सेवा परिपूर्ण होते.
२. ‘गुरुसेवेची फलनिष्पत्ती, ही साधनेची फलनिष्पत्ती’ ही जाणीव ठेवून सेवा केली, तर सेवा परिपूर्ण होऊन तिच्यातून आध्यात्मिक प्रगतीही होते.
३. आपण समष्टी सेवेत दायित्व घेण्याची तयारी दर्शवली की, आपल्याला तयार (सेवेत निपुण) करण्याचे दायित्व देव घेतो !
४. गुरूंच्या निर्गुण रूपाची (गुरूंनी दिलेल्या सेवेची) गोडी लागली की, गुरूंच्या सगुण रूपात अडकणे आपोआप अल्प होते.’
– (पू.) संदीप आळशी (२५.६.२०२४)