१. ‘शारीरिक, मानसिक किंवा व्यावहारिक स्थिती चांगली नसतांनाही जो साधनेसाठी चिकाटीने प्रयत्न करतो, तो ‘चांगला साधक’ !
२. एखाद्याने आपल्याला सेवेत सुधारणा किंवा चुका सांगितल्या, तर तो ‘आपल्यासाठी त्याचा वेळ आणि बुद्धी देत आहे’, याविषयी आपल्याला त्याच्याविषयी कृतज्ञताच वाटली पाहिजे.
३. आपण जितके अधिक सकारात्मक राहू, तितकी आपल्याला साधनेची शिकवण अधिक आत्मसात करता येते.
४. ‘समष्टी सेवेत साधक सेवा किती कौशल्याने करतात, यापेक्षा ते मनाने किती एक होऊन सेवा करतात’, हे देव पहातो !’
– (पू.) संदीप आळशी (९.४.२०२४)