कोटी कोटी प्रणाम !

• महर्षि अरविंद यांचे आज पुण्यस्मरण
• वेतोरे (तालुका वेंगुर्ले) येथील श्री सातेरीदेवीचा आज जत्रोत्सव
• कालेली (तालुका कुडाळ) येथील जागृत देवस्थान श्री लिंग महादेवाचा जत्रोत्सव

छत्तीसगड येथील जामडीचे श्री पाटेश्‍वर धामाला (जिल्हा बालोद) संपूर्णपणे संरक्षण मिळावे ! – हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे राज्यपालांना निवेदन

राज्यपाल उइके यांनी हिंदुत्वनिष्ठ संघटनेच्या शिष्टमंडळाला या धामाचे संरक्षण करण्याचे आश्‍वासन दिले, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

श्री बगलामुखी यागाच्या स्थळी संतांचे आगमन होण्यापूर्वी आणि नंतर लक्षात आलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे

‘रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात नवरात्रीच्या कालावधीत श्री बगलामुखी याग करण्यात आला. यागाच्या दुसर्‍या दिवशी (९.१०.२०१६ ला) मला पुढील सूत्रे लक्षात आली.

ज्ञानीच वैकुंठाचे मोल जाणू शकणे

‘तुकाराम महाराज आवडीला (पत्नीला) वैकुंठाला नेणार होते. तेव्हा आवडी म्हणाली, ‘‘जावा तुम्ही. माझ्या म्हशीचे कोण करणार ?’’

आजचे दिनविशेष

• गुरुनानक जयंती
• तुळशी विवाह समाप्त
• कार्तिकस्नान समाप्त
• स्वदेशी चळवळीचे राजीव दीक्षित यांचा स्मृतीदिन

श्री क्षेत्र बेलगुरु, कर्नाटक येथील स्वामी बिंदू माधव शर्मा यांचा देहत्याग

स्वामी बिंदू माधव शर्मा हे कवी, नाटककारही होते, तसेच त्यांनी अनेक ग्रंथ आणि कविता लेखन केले आहे. कर्नाटकातील विजयनगरच्या शासनकाळात बांधलेल्या श्री मारुति मंदिराचा त्यांनी जीर्णोद्धार केला होता. त्यांनी कोटी रुद्रयागही केला होता.

केवळ मनुष्य जन्मातच भगवद्धामात परत जाण्यासाठीची परमोच्च संधी !

आपण परमेश्‍वराचे अंश आहोत; पण काही कारणाने आपण या संसारी जीवनात पडलो आहोत. आता आपल्याला अशा रितीने उत्क्रांत व्हावयाचे आहे की, ज्यायोगे आपण भगवद्धामात परत जाऊ शकू. हीच परमोच्च संसिद्धी (संधी) होय !

ईश्‍वराला जाणून घेतल्याविना खरी शांती अन् सुख मिळणे अशक्य !

आपण सुखासमाधानात रहावे; परंतु त्याच वेळी आपण कृष्णभावात किंवा ईश्‍वरभावात असावे, त्यामुळे आपण सुखी होऊ. ईश्‍वराला जाणून घेतल्याविना आणि ईश्‍वराशी भावातीत झाल्याविना खरी शांती अन् सुख मिळण्याची शक्यता नाही.

रामपूर (कर्नाटक) येथील कीर्तनकार आणि रामभक्त सदानंद भस्मे महाराज (वय ७८ वर्षे) संतपदी विराजमान !

‘आतापर्यंत आपण कीर्तनकार सदानंद भस्मे महाराज यांना ‘कीर्तनकार’ म्हणून ओळखत होतो. आजपासून आपण त्यांना ‘संत भस्मे महाराज’ असे म्हणणार आहोत. अशा प्रकारे एका कीर्तनकाराला ‘संत’ म्हणून घोषित करण्याचा सनातन संस्थेच्या इतिहासातील हा पहिलाच अद्वितीय क्षण आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले