ईश्‍वराला जाणून घेतल्याविना खरी शांती अन् सुख मिळणे अशक्य !

या मानव जीवनात तुम्ही जर तुमच्या प्रयत्नांची पराकाष्ठा कराल, तर पुढील जीवनात तुम्हाला आध्यात्मिक देह मिळू शकेल. तुमचा आध्यात्मिक देह तुमच्यामध्येच आहे आणि तो या भौतिक जीवनाच्या दोषांतून मुक्त झाला की, लगेच त्या आध्यात्मिक देहाचा विकास होतो. जो मनुष्य परमेश्‍वराला अथवा श्रीकृष्णाला जाणतो, तो देहत्यागानंतर दुसर्‍या भौतिक शरीराचा स्वीकार करण्याकरता पुन्हा परत येत नाही. म्हणून कुत्र्या-मांजराप्रमाणे आपण व्यर्थ कालापव्यय करू नये. आपण सुखासमाधानात रहावे; परंतु त्याच वेळी आपण कृष्णभावात किंवा ईश्‍वरभावात असावे, त्यामुळे आपण सुखी होऊ. ईश्‍वराला जाणून घेतल्याविना आणि ईश्‍वराशी भावातीत झाल्याविना खरी शांती अन् सुख मिळण्याची शक्यता नाही.

– स्वामी श्रील भक्तीवेदांत प्रभुपाद

(संदर्भ : आत्मसाक्षात्काराचे विज्ञान)